Homeताज्या बातम्यामुंबई - ठाणे

पेट्रोल डिझेलचा तुटवडा सरकार जाणीवपूर्वक करतय- बीड जिल्हा काँग्रेस कमिटीसर्वसामान्यांना त्रस्त करून पेट्रोल डिझेलचा तुटवडा तयार करून भाव वाढवण्याचा डाव

जिल्ह्यातच नव्हे तर भारतात मागच्या चार-पाच दिवसापासून जाणीवपूर्वक सरकारकडून पेट्रोल व डिझेलचे वितरण वेळेवर केले जात नाही त्यामुळे कोणत्याही पेट्र

दरोडा व बलात्काराच्या गुन्हयात आरोपीस 10 वर्षे सक्तमजुरी
शेतकरी ग्राहकांनी बियाणे व खते खरेदी करताना दक्षता घ्यावी-अनिल बोर्डे
निस्वार्थ सेवा आणि सामाजिक बांधिलकीमुळेच ’तुलसी’ ला यश मिळाले; पुज्य भदंत डॉ.उपगुप्त महाथेरो यांचे प्रतिपादनतुलसी फॅशन कॉलेजच्या नूतन वास्तू व ’तुलसी क्रिएशन’ शोरूमचे दिमाखात उद्घाटन संपन्न


जिल्ह्यातच नव्हे तर भारतात मागच्या चार-पाच दिवसापासून जाणीवपूर्वक सरकारकडून पेट्रोल व डिझेलचे वितरण वेळेवर केले जात नाही त्यामुळे कोणत्याही पेट्रोल पंपावरती वेळेवर डिझेल पेट्रोल येत नाही. केवळ जाणीवपूर्वक सर्व ठिकाणी पेट्रोल डिझेलचा स्टॉक करून सर्वसामान्यांना कसा जास्तीत जास्त त्रास देता येईल तो त्रास देऊन पेट्रोल डिझेलचा तुटवडा तयार करणे चालू आहे जेणेकरून सर्वसामान्य पेट्रोल डिझेलच्या असणार्‍या किमतीपेक्षा जास्त पैसे देऊन पेट्रोल डिझेल खरेदी करेल आलेली गरज भागवण्याचा प्रयत्न करेल त्यानंतर सरकारच पेट्रोल डिझेलचे भाव वाढवेल आणि हे भाव सर्वसामान्यांच्या खिशाला न परवडणारे असतील. प्रत्यक्षात आधी तुटवडा तयार करायचा नंतर महागात पेट्रोल खरेदी करण्यासाठी सर्वसामान्यांची मानसिकता बनवायची व हळूच पेट्रोल डिझेलचे भाव वाढवायचे हा सरकारचा डाव असून हा डाव काँग्रेस पक्ष यांनी ओळखून सर्वसामान्याला न परवडणारी महागाई आधीच झाले आहे त्यामध्ये पुन्हा पेट्रोल डिझेलची भर म्हणजे सर्वसामान्याला जीवन जगणे अवघड झाले आहे. या सरकारच्या डावाला हाणून पाडण्यासाठी काँग्रेस सर्वतोपरी प्रयत्न करणार. सरकारच्या पेट्रोल डिझेल भाव वाढीचा तीव्र निषेध करून जाणीवपूर्वक सध्या सर्वसामान्याला त्रास होईल या उद्देशाने पेट्रोल डिझेलचा तुटवडा करत आहे.निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पेट्रोल-डिझेलच्या किमती वाढण्याच्या अफवांमुळे निर्माण झालेली कृत्रिम टंचाई व पेट्रोल पंपधारकांच्या मनमानी बाबत निवेदन.
सध्याच्या काळात विविध राज्यांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पेट्रोल व डिझेलच्या किमती भरमसाट वाढणार असल्याच्या दिशाभूल करणार्‍या अफवा वृत्तांमुळे बीड जिल्ह्यातील अनेक पेट्रोल पंपांवर सामान्य जनतेमध्ये घबराट निर्माण झाली आहे. या कारणास्तव नागरिकांनी पेट्रोल व डिझेल साठविण्यास सुरुवात केली आहे, ज्यामुळे पंपांवर अचानक गर्दी निर्माण झाली आहे. मात्र, गंभीर बाब अशी की, काही पेट्रोल पंपधारकांनी या परिस्थितीचा फायदा उठवून कृत्रिम टंचाई निर्माण केली आहे. त्यामुळे पेट्रोलपंपांवर इंधनाचा पुरवठा संपूर्णपणे बंद करण्यात आला असून, सर्वसामान्य जनतेला तासनतास रांगेत थांबून वेटिंग करण्यास भाग पाडले जात आहे. ही पद्धत अत्यंत निंदनीय असून, यामुळे नागरिकांचा मौल्यवान वेळ व शक्तीचा अपव्यय होत आहे. तसेच, आपत्कालीन परिस्थितीत रुग्णवाहिका, अग्निशमन दल, शासकीय वाहने यांनाही इंधनाचा त्रास होण्याची शक्यता आहे. वास्तविक, सरकारकडून अद्याप कोणतीही अधिकृत किमतीवाढ जाहीर करण्यात आलेली नाही. अफवांच्या आधारे ही कृत्रिम टंचाई निर्माण करून जनतेच्या भावना भडकावल्या जात आहेत. ही कृती केवळ बेकायदेशीरच नव्हे, तर सामाजिक शांततेला बाधक आहे. निवेदन मुद्दे जिल्ह्यातील सर्व पेट्रोल पंपांवर त्वरित पाहणी करून इंधनाच्या उपलब्धतेचा अहवाल द्यावा.कृत्रिम टंचाई निर्माण करणार्‍या पेट्रोल पंपधारकांवर कठोर कायदेशीर कारवाई करावी.नागरिकांनी अफवांना बळी न पडता नियमित पद्धतीने इंधन खरेदी करावे, याबाबत जनजागृती करावी. पेट्रोल पंपांवर इंधनाचा पुरवठा सुरळीत राहील राहतील, अशी खात्री सर्वसामान्य जनतेला जिल्ह्यातील वरिष्ठ अधिकारी यांच्यामार्फत सोशल मीडियावर देण्यात यावी.पेट्रोल आणि डिझेलवर लावण्यात आलेले भरमसाठ कर (उशपीींरश्र  डींरींश ढरुशी) तात्काळ कमी करण्यात यावेत.गेल्या काही दिवसांपासून होत असलेली दरवाढ मागे घेऊन इंधनाचे दर पूर्वीच्या पातळीवर आणावेत.इंधन दरवाढीमुळे जीवनावश्यक वस्तूंच्या किमतींमध्ये होणारी वाढ थांबवावी. सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लावणारी ही दरवाढ जनतेची आर्थिक लूट करणारी आहे, ती तात्काळ थांबवावी.म्हणून आपणास विनंती आहे की, वरील गंभीर परिस्थितीचा त्वरीत आढावा घेऊन योग्य ती दखल घ्यावी, जेणेकरून सर्वसामान्य जनतेला पेट्रोल पंपधारकांच्या मनमानीपासून दिलासा मिळेल. तसेच सरकारच्या विरोधात बीड जिल्हा काँग्रेसने आज जिल्हाधिकारी साहेब बीड यांना या सर्व सामान्याच्या व्यथा कळवण्यासाठी निवेदन दिले आहे. यावेळी विधी विभागाचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. गणेश करांडे, शामसुंदर जाधव, संभाजी जाधव,अ‍ॅड. विद्या गायकवाड, रमेश सानप इत्यादी निवेदन देण्यासाठी उपस्थित होते.

COMMENTS