Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मिराई नगरी सहकारी पतसंस्था मर्यादित, बीड यांना महाराष्ट्र उद्योगरत्न पुरस्कार 2026 ने सन्मानित

मिराई नगरी सहकारी पतसंस्था मर्यादित, बीड यांना महाराष्ट्र उद्योगरत्न पुरस्कार 2026 या प्रतिष्ठित पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. वित्तीय से

केज शहरातील भवानी चौकात पुन्हा विचित्र अपघातभवानी चौक ठरू लागला अपघाताला निमंत्रण
जिल्ह्यातील शेतकरी ग्राहकांना बियाणे तात्काळ उपलब्ध करून द्या-अनिल बोर्डे
मतदार यादी विशेष संक्षिप्त पुनरीक्षण मोहिमेला गवळवाडीत उत्स्फूर्त प्रतिसादतहसीलदार चंद्रकांत शेळके यांची प्रत्यक्ष भेट; घरपोच गणना प्रपत्र वाटप करून मतदारांना केले जागृत



मिराई नगरी सहकारी पतसंस्था मर्यादित, बीड यांना महाराष्ट्र उद्योगरत्न पुरस्कार 2026 या प्रतिष्ठित पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. वित्तीय सेवा क्षेत्रात सहकार क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरीबद्दल हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार 1 मे 2026 रोजी नाशिक येथे पार पडलेल्या सोहळ्यात महाराष्ट्राचे सुप्रसिध्द अभिनेते मा. श्री मकरंद अनासपुरे यांच्या हस्ते देण्यात आला. उद्योग व सहकार क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणार्‍या संस्था व उद्योजकांचा गौरव करण्यासाठी हा पुरस्कार ठशीशरश्र.ळप या संस्थेकडुन प्रत्येक वर्षी दिला जातो. मिराई नगरी सहकारी पतसंस्थेने ग्राहकाभिमुख सेवा, पारदर्शक व्यवहार आणि आर्थिक सबलीकरणाच्या दृष्टीने केलेल्या कार्याची दखल घेत हा सन्मान देण्यात आला आहे. संस्थेच्या या यशामुळे बीड जिल्ह्याच्या सहकार क्षेत्रात अभिमानाची भावना निर्माण झाली आहे. संस्थेचे पदाधिकारी व कर्मचारी यांच्या एकत्रित प्रयत्नांमुळे हे यश शक्य झाल्याचे मत संस्थेचे विद्यमान अध्यक्ष श्री खरसाडे रघुनाथ (नाना) यांनी व्यक्त करण्यात आले. या सन्मानामुळे भविष्यात अधिक गुणवत्तापूर्ण सेवा देण्याची प्रेरणा मिळाल्याची प्रतिक्रिया संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री खरसाडे नवनाथ यांच्याकडून देण्यात आली आहे.

COMMENTS