Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मुंबईत अन्नातून विषबाधा; चौघांचा मृत्यू

मुंबई : शहरातील पायधुनी परिसरात एक अत्यंत धक्कादायक घटना उघडकीस आली असून अन्नातून झालेल्या संभाव्य विषबाधेमुळे एकाच कुटुंबातील चार जणांचा मृत्यू

मुंबईतील 6 नामांकित हॉटेल्सवर एफडीएची कारवाईपरवानेही रद्द ; ग्राहकांच्या आरोग्याशी तडजोड नाही
महाराष्ट्रात अ‍ॅनालॉग पनीर आणि चीजवर बंदी आणण्याची जोरदार मागणी; आरोग्यासाठी ठरू शकते घातक!
हॉटेलमधील‘बनावट’ पनीर वापरल्यास कारवाई
Mumbai Family Death: बिर्याणी-कलिंगड खाल्ल्याने मुंबईत ४ जणांचा मृत्यू; काय  सांगतायत डॉक्टर?

मुंबई : शहरातील पायधुनी परिसरात एक अत्यंत धक्कादायक घटना उघडकीस आली असून अन्नातून झालेल्या संभाव्य विषबाधेमुळे एकाच कुटुंबातील चार जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून मृतांमध्ये दोन अल्पवयीन मुलींचा समावेश आहे.
पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, संबंधित कुटुंबाने शनिवारी रात्री उशिरा नातेवाईकांसोबत जेवण केले होते. जेवणामध्ये बिर्याणी खाल्ल्यानंतर कलिंगड खाल्ल्याचे सांगितले जात आहे. दुसर्‍याच दिवशी कुटुंबातील सर्व सदस्यांना उलटी, जुलाब, चक्कर आणि पोटदुखीचा त्रास सुरू झाला. प्रकृती बिघडल्याने त्यांनी प्रथम स्थानिक डॉक्टरांचा सल्ला घेतला. मात्र, स्थिती गंभीर असल्याने त्यांना तातडीने जेजे रुग्णालय येथे दाखल करण्यात आले. रुग्णालयात उपचार सुरू असतानाच कुटुंबातील एका मुलीचा मृत्यू झाला. त्यानंतर काही तासांत दुसर्‍या मुलीनेही प्राण गमावले. मुलींच्या मृत्यूनंतर थोड्याच वेळात आई-वडिलांचाही मृत्यू झाला. त्यामुळे संपूर्ण कुटुंब एका दिवसात उद्ध्वस्त झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. मृतांची ओळख अब्दुल्ला डोकाडिया (वय 40), नसरीन डोकाडिया (वय 35) आणि त्यांच्या मुली आयशा (16) व झैनब (13) अशी झाली आहे. हे कुटुंब पायधुनीतील घाटी गल्ली परिसरातील मुघल बिल्डिंगमध्ये वास्तव्यास होते. पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून अन्नातून विषबाधा झाल्याची प्राथमिक शक्यता वर्तवण्यात येत आहे. मृत्यूपूर्वी कुटुंबातील एका सदस्याने दिलेल्या जबाबात बिर्याणी आणि कलिंगड खाल्ल्याचा उल्लेख केला आहे. मात्र, नेमका मृत्यू कशामुळे झाला हे शवविच्छेदन अहवालानंतरच स्पष्ट होणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. चारही मृतदेहांचे शवविच्छेदन करण्यात आले असून अन्नाचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. दरम्यान, या घटनेमुळे अन्नसुरक्षेबाबत प्रश्‍नचिन्ह उपस्थित झाले असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

COMMENTS