सातारा जिल्हा बँकेस 150 कोटींचा करपूर्व नफा : आ. श्री. छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले

Homeमहाराष्ट्रसातारा

सातारा जिल्हा बँकेस 150 कोटींचा करपूर्व नफा : आ. श्री. छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले

सन 2020-21 या आर्थिक वर्षात अर्थव्यवस्था, बँकिंग, उद्योग व व्यवसाय या सर्व क्षेत्रांना कोरोनाच्या संकटामुळे अडचणी निर्माण झाल्या.

कर्जतच्या कोटा मेंटॉर्स स्कूलची विस्ताराधिकार्‍यांनी केली तपासणी
पाथरवट समाज सेवा मंडळाच्या अध्यक्षपदी डॉ. अनिकेत गगे
ट्रक चालकाने केली टीव्हीची परस्पर विक्री

सातारा / प्रतिनिधी : सन 2020-21 या आर्थिक वर्षात अर्थव्यवस्था, बँकिंग, उद्योग व व्यवसाय या सर्व क्षेत्रांना कोरोनाच्या संकटामुळे अडचणी निर्माण झाल्या. या अडचणींवर मात करत सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने बँकिंग क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत बँकेच्या प्रगतीचा आलेख उंचावत ठेऊन बँकेची गौरवशाली परंपरा कायम राखली आहे. बँकेच्या आजपर्यंतच्या वाटचालीस सर्वांनीच बँकेला मनोभावे सहकार्य केल्यामुळेच जिल्हा स्वयंपूर्ण होणेसाठी व जिल्हयाचे आर्थिक विकासात बँकेला अग्रेसर राहता आले. त्यामुळेच राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँकेमार्फत जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांना दिला जाणारा राष्ट्रीय पातळीवरील ‘सर्वोत्कृष्ठ कार्यक्षमता पुरस्कार’ सहावेळा प्राप्त होवून गौरविण्यात आले आहे. 

दि. 31 मार्च अखेर बँकेचा संमिश्र व्यवसाय 13 हजार 845 कोटीचा झालेला आहे. गतवर्षीच्या तुलनेत संमिश्र व्यवसायात 978 कोटीची वाढ झाली आहे. 31 मार्च अखेर बँकेच्या ठेवी 8 हजार 430 कोटी 5 लाख झालेल्या आहे. गतवर्षीच्या तुलनेत ठेवीमध्ये 807 कोटी 77 लाखाची वाढ झाली आहे. बँकेची वर्षाखेर एकूण कर्जे 5 हजार 415 कोटी 25 लाख असून, गतवर्षीच्या तुलनेत एकूण कर्जात 170 कोटीने वाढ झाली आहे. बँकेची गुंतवणुक 3 हजार 975 कोटी 70 लाख असून गतवर्षीच्या तुलनेत यामध्ये 804 कोटीने वाढ झाली आहे. बँकेचे स्वनिधी 658 कोटी 20 लाख असून गतवर्षीच्या तुलनेत यामध्ये 53 कोटी 84 लाखाने वाढ झाली. बँकेचा ढोबळ करपूर्व नफा 150 कोटी झाला. गतवर्षीच्या तुलनेत ढोबळ करपूर्व नफा 16 कोटी 55 लाखाने वाढला. बँकेने सलग 14 व्या वर्षी बँकेच्या नक्त अनुत्पादक कर्जाचे प्रमाण शून्य टक्के राखले आहे.        

कोरोना संकटाच्या पार्श्‍वभूमीवर जिल्ह्यातील शेतकरी, नोकरदार, व्यावसायिक, साखर कारखाने, आणि इतर सहकारी संस्थांनी बँकेवर दाखविलेल्या विश्‍वासामुळे बँकेस हे उत्तुंग यश प्राप्त करणे शक्य झालेले आहे. सन 2019-20 या आर्थिक वर्षासाठी बँकेने सभासद संस्थाना त्यांचे भागभांडवलावर 12 टक्के लाभांश देणेची तरतूद केली होती. परंतू कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर बँका सक्षम राहाव्यात म्हणून रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने सर्व बँकांना दि. 31 मार्च 2020 च्या नफ्यातून लाभांश वितरीत करू नये, असे निर्देश दिले होते. त्यामुळे बँकेस सभासद संस्थाना लाभांश देता आला नाही. तथापि, विकास संस्थाच्या मध्यम / दीर्घ मुदत कर्जाच्या येणे बाकीवर रिबेट व प्रोत्साहनात्मक रक्कम देणेचे तसेच कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर कर्जदार सभासदांना मेडिक्लेम, पिक कर्जावरील व्याज परतावा इत्यादी लाभ देणेचा संचालक मंडळाच्या विचाराधीन आहे. यामुळे विकास संस्था सक्षम होणेस मदत होणार आहे. 

शेतकरी हा घटक, कृषी व ग्रामीण अर्थव्यवस्थेचा प्रमुख कणा आहे. सन 2021-22 या आर्थिक वर्षात या शेतकरी वर्गास लाभदायी योजनांमार्फत मदत करण्याचे बँकेच्या संचालक मंडळाने निश्‍चित केले आहे. बँकेच्या या यशात बँकेचे विद्यमान चेअरमन आ. श्री. छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले, बँकेचे ज्येष्ठ संचालक व विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर, संचालक व सहकार व पणन मंत्री बाळासाहेब पाटील, आणि सर्व संचालक मंडळाचे मार्गदर्शन आणि दूरदृष्टी बँकेच्या या प्रगतीस मोलाची ठरलेली आहे. 

COMMENTS