Homeताज्या बातम्यामुंबई - ठाणे

हॉटेलमधील‘बनावट’ पनीर वापरल्यास कारवाई

मुंबई : हॉटेल आणि रेस्टॉरंटमध्ये पनीरच्या नावाखाली स्वस्त ‘चीज नालॉग’ वापरून ग्राहकांची फसवणूक होत असल्याच्या तक्रारी वाढत असताना, महाराष्ट्र सरक

एफडीए चा अहवाल वास्तव की दिशाभूल करणारा ?
अन्नसुरक्षा अधिकाऱ्यावर कारवाईची मागणी; स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे निवेदन
कुंडलवाडी शहरात भेसळयुक्त विक्रीचा प्रकार; नागरिकांमध्ये संताप
क्या आपका पनीर नकली है? इससे पहले कि बहुत देर हो जाए, घर पर ही इसे पहचानने  के 5 तरीके - इंडिया टुडे

मुंबई : हॉटेल आणि रेस्टॉरंटमध्ये पनीरच्या नावाखाली स्वस्त ‘चीज नालॉग’ वापरून ग्राहकांची फसवणूक होत असल्याच्या तक्रारी वाढत असताना, महाराष्ट्र सरकारने यावर लगाम घालण्यासाठी ठोस पाऊल उचलले आहे. आता पदार्थात नैसर्गिक पनीरऐवजी पर्यायी किंवा बनावट घटकांचा वापर केल्यास, त्याचा स्पष्ट उल्लेख मेन्यूकार्ड किंवा इलेक्ट्रॉनिक डिस्प्लेवर करणे कायदेशीरदृष्ट्या अनिवार्य करण्यात आले आहे. राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या निर्देशानुसार ही मोहीम 27 एप्रिल 2026 पासून राज्यभर राबवली जाणार आहे. नियमांचे उल्लंघन करणार्‍या हॉटेल व्यावसायिकांवर दंडात्मक कारवाई करण्याचा इशाराही प्रशासनाने दिला आहे. या निर्णयामुळे ग्राहकांना मिळणार्‍या अन्नपदार्थांची गुणवत्ता अधिक पारदर्शक होणार असून, ‘पनीर’ नावाखाली दिल्या जाणार्‍या बनावट पदार्थांवर आळा बसण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

COMMENTS