Homeताज्या बातम्यामुंबई - ठाणे

राजधानी एक्सप्रेसला आग, जीवितहानी नाही; १५ मिनिटांत ६८ प्रवाशांची सुटका, मोठी दुर्घटना टळली

कोटा : तिरुवनंतपुरम-हजरत निजामुद्दीन राजधानी एक्सप्रेसच्या दोन डब्यांत रविवारी पहाटे भीषण आग लागल्याची घटना मध्य प्रदेशातील विक्रमगढ आलोट स्थानका

शाँर्ट सर्किटमुळे केसर आंब्याची बाग जळुन खाकआष्टी तालुक्यातील बीड सांगवी – गणगेवाडी येथील घटना; शेतकर्‍याचे लाखोंचे नुकसान
गॅस सिलिंडरच्या स्फोटात महिलेचा मृत्यूछत्रपती संभाजीनगरातील घटना ; नऊ जणांचा वाचले प्राण
लखनऊमध्ये आगीचे तांडव! २० हून अधिक सिलेंडरचे स्फोट आणि शेकडो संसार खाक
तिरुवनंतपुरम-दिल्ली राजधानी एक्स्प्रेसच्या दोन बोगीमध्ये भीषण अग्नितांडव;  अवघ्या 15 मिनिटात 68 प्रवाशांना बाहेर काढल्याने जिवितहानी टळली ...

कोटा : तिरुवनंतपुरम-हजरत निजामुद्दीन राजधानी एक्सप्रेसच्या दोन डब्यांत रविवारी पहाटे भीषण आग लागल्याची घटना मध्य प्रदेशातील विक्रमगढ आलोट स्थानकाजवळ घडली. तत्परता आणि वेगवान बचावकार्यामुळे अवघ्या पंधरा मिनिटांत ६८ प्रवाशांना सुरक्षित बाहेर काढण्यात आल्याने मोठी जीवितहानी टळली.

कोटा विभागातील लुनियारिच्छा आणि विक्रमगढ आलोट स्थानकांदरम्यान पहाटे सव्वापाचच्या सुमारास ही घटना घडली. बी-१ क्रमांकाच्या वातानुकूलित (AC) डब्याला प्रथम आग लागली. त्यानंतर मागील सामान व रक्षक डब्यालाही (Luggage & Guard Van) आगीने वेढले. गार्डने तत्काळ इंजिन चालकाला सतर्क केल्याने रेल्वे तातडीने थांबवण्यात आली. घटनास्थळी मदत व बचाव पथके दाखल झाल्यानंतर प्रवाशांना वेगाने बाहेर काढण्याचे काम सुरू झाले. वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक सौरभ जैन यांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित डब्यात ६८ प्रवासी होते. सर्वांना सुरक्षित बाहेर काढण्यात यश आले असून कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

आग काही मिनिटांतच संपूर्ण डब्यात पसरल्याने प्रवाशांमध्ये घबराट निर्माण झाली होती. सामान ठेवण्यात आलेल्या डब्यातील अनेक वस्तू जळून खाक झाल्या. सुदैवाने त्या डब्यात प्रवासी नव्हते. रेल्वे प्रशासनाने आगीचे नेमके कारण शोधण्यासाठी चौकशी सुरू केली आहे. तिरुवनंतपुरमहून दिल्लीकडे जाणारी राजधानी रेल्वे पहाटे रतलाम स्थानकावरून पुढे रवाना झाली होती. कोटा हे तिचे पुढील नियोजित स्थानक होते. मात्र राजस्थानमध्ये प्रवेश करण्यापूर्वीच हा अपघात घडला.

घटनेनंतर दिल्ली-मुंबई मुख्य रेल्वेमार्गावरील वाहतूक काही काळासाठी थांबवण्यात आली. सुरक्षेच्या कारणास्तव वीजपुरवठाही खंडित करण्यात आला. आगीग्रस्त डबा रेल्वेपासून वेगळा करण्यात आला. जवळपास दोन तासांच्या प्रयत्नांनंतर आग नियंत्रणात आणण्यात आली. यानंतर प्रवाशांना अन्य डब्यांत हलवण्यात आले. सुमारे चार तासांच्या विलंबाने सकाळी नऊच्या सुमारास रेल्वे कोोटाच्या दिशेने रवाना झाली. कोटा येथे अतिरिक्त डबा जोडून प्रभावित प्रवाशांची व्यवस्था करण्यात येणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले. या घटनेमुळे मुंबई-जयपूर सुपरफास्ट रेल्वेसह काही गाड्या मार्गातच थांबवण्यात आल्या असून रेल्वे वाहतुकीवर परिणाम झाला आहे.

COMMENTS