Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कल्याण रेल्वे स्थानकावर अल्पवयीन मुलीवर अत्याचार; नराधम आरोपीच्या मुसक्या आवळल्या

मुंबई : अहिल्यानगरहून खोपोली येथे आपल्या मामाच्या घरी जाणाऱ्या एका अल्पवयीन मुलीवर नराधमाने कल्याण रेल्वे स्थानक परिसरात अत्याचार केल्याची धक्काद

भोंदू बाबा अशोक खरातला तुरुंगातही मिळणार भूसंपादनाचे तीन कोटी; अहिल्यानगरमध्ये जोरदार चर्चा
ममता बॅनर्जी करणार काँग्रेसमध्ये ‘घरवापसी’? तृणमूलचे काँग्रेसमध्ये विलीनीकरणाच्या चर्चा
देगलूर-बिलोलीत उभारणार अत्याधुनिक ‘कृषी भवन’; शेतकऱ्यांसाठी आमदार जितेश अंतापूरकर यांचे मोठे पाऊल
Kalyan Crime: धावत्या एक्सप्रेसमध्ये अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार;  ट्रेनच्या टॉयलेटमध्ये नेलं आणि... | Times Now Marathi

मुंबई : अहिल्यानगरहून खोपोली येथे आपल्या मामाच्या घरी जाणाऱ्या एका अल्पवयीन मुलीवर नराधमाने कल्याण रेल्वे स्थानक परिसरात अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे महाराष्ट्रात पुन्हा एकदा संतापाची लाट उसळली असून महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

सविस्तर माहिती अशी की, पीडित मुलगी कल्याण रेल्वे स्थानकावर लोकल ट्रेनची वाट पाहत उभी होती. यादरम्यान आरोपी सौरभ सोनावणे याने तिच्या हातातील मोबाईल हिसकावून घेतला. मुलीने मोबाईल परत मागितला असता, ‘मोबाईल हवा असेल तर माझ्यासोबत पोलीस स्टेशनमध्ये चल’ असे म्हणून त्याने तिला विश्वासात घेतले आणि कल्याण रेल्वे यार्डात नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केला.

पीडितेने कशीबशी स्वतःची सुटका करून घेत रेल्वे पोलीस ठाणे गाठले आणि आपबिती सांगितली. घटनेचे गांभीर्य ओळखून रेल्वे पोलिसांनी तत्काळ तपास सुरू केला आणि कल्याण स्थानकातील सीसीटीव्ही फुटेज खंगाळून आरोपी सौरभ सोनावणे याच्या मुसक्या आवळल्या. २४ तास प्रवाशांची वर्दळ असणाऱ्या कल्याण स्थानकावर हा प्रकार घडल्याने आश्चर्य आणि संताप व्यक्त होत आहे. घटना घडत असताना काही प्रवासी उपस्थित असूनही त्यांनी मुलीला मदत केली नसल्याचे समोर आले असून, रेल्वेच्या सुरक्षा व्यवस्थेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

नराधमाला फाशी झाली पाहिजे : आमदार राजेश मोरे

“ही अत्यंत धक्कादायक घटना आहे. महिलांना टार्गेट करून असे अत्याचार करणाऱ्या नराधमांवर कठोर कारवाई झाली पाहिजे. मी रेल्वे पोलीस अधिकाऱ्यांशी चर्चा केली आहे. या नराधमावर फास्ट ट्रॅक कोर्टात केस चालवून त्याला फाशीची शिक्षा झाली पाहिजे, अशी माझी मागणी आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याशी पत्रव्यवहार करून मी या प्रकरणात कठोर कारवाईची मागणी करणार आहे,” अशी संतप्त प्रतिक्रिया स्थानिक आमदार राजेश मोरे यांनी दिली.

COMMENTS