स्वतःची इंटरनेट सेवा असणारे केरळ देशातील पहिले राज्य

Homeताज्या बातम्यादेश

स्वतःची इंटरनेट सेवा असणारे केरळ देशातील पहिले राज्य

20 लाख कुटुंबांना, 30 हजार सरकारी कार्यालयांना मोफत इंटरनेट सेवा

तिरुवनंतपुरम/वृत्तसंस्था : केरळ राज्य शिक्षणाच्या बाबतीत आघाडीवर असून, तेथील साक्षरतेचे प्रमाण देशात सर्वाधिक आहे. या अतिप्रगत असणार्‍या केरळ राज्यान

सर्वोत्कृष्ट शास्त्रज्ञांच्या यादीत डॉ. राजाराम माने
देशातील सर्वात मोठा ‘ऑटो शो’ आजपासून सुरू
Innova Crysta खरेदी करण्यासाठी ग्राहकांच्या रांगा.

तिरुवनंतपुरम/वृत्तसंस्था : केरळ राज्य शिक्षणाच्या बाबतीत आघाडीवर असून, तेथील साक्षरतेचे प्रमाण देशात सर्वाधिक आहे. या अतिप्रगत असणार्‍या केरळ राज्याने इंटरनेटच्या क्षेत्रात देखील केरळ राज्याने महत्त्वाचे यश संपादन केले असून स्वत:ची इंटरनेट सेवा कार्यान्वित करणारे केरळ राज्य हे देशातील पहिले आणि एकमेव राज्य ठरले आहे, याबाबत मुख्यमंत्री पी. विजयन यांनी ही माहिती दिली आहे.
पी. विजयन म्हणाले की, केरळ फायबर ऑप्टिक नेटवर्क लिमिटेडला अर्थात केएफओएनला दूरसंचार विभागाकडून इंटरनेट सेवा प्रदाता परवाना मिळाला आहे. आता आमचा प्रतिष्ठीत केएफओएन प्रकल्प मूलभूत अधिकारांपैकी एक म्हणून इंटरनेट सेवा देण्याचे कार्य सुरू करू शकतो. या योजनेअंतर्गत संपूर्ण राज्यात इंटरनेट नेटवर्क पसरवण्याकडे मुख्यमंत्र्यांनी लक्ष वेधले आहे. केरळ फायबर ऑप्टिक नेटवर्क लिमिटेड ही सरकारची महत्त्वाकांक्षी आयटी पायाभूत सुविधा योजना आहे. ज्या अंतर्गत राज्यातील प्रत्येक कानाकोपर्‍यातील प्रत्येक व्यक्तीला मोफत इंटरनेट सुविधा उपलब्ध करून दिली जाईल. या योजनेअंतर्गत राज्यातील प्रत्येक गावात आणि शहरापर्यंत इंटरनेट सुविधा उपलब्ध होणार आहे. मागील केरळ सरकारने 1,548 कोटी रुपयांच्या केएफओएन या प्रकल्पाला 2019 मध्ये मंजूरी दिली होती. या प्रकल्पाच्या माध्यमातून 20 लाख बीपीएलधारक कुटुंबांना मोफत इंटरनेट कनेक्शन दिले जाणार आहे. याशिवाय राज्यातील 30 हजारांहून अधिक सरकारी कार्यालये आणि शाळाही या योजनेशी जोडल्या जाणार आहेत. इंटरनेट योजनेमुळे वाहतूक, व्यवस्थापन आणि आयटी क्षेत्रांनाही चालना मिळेल. केरळ सरकारच्या म्हणण्यानुसार, इंटरनेटचा वापर हा राज्यघटनेच्या शिक्षणाचा हक्क आणि गोपनीयतेच्या अधिकाराचा भाग आहे.

COMMENTS