Homeताज्या बातम्या

कॅप्टन आशिष दामले यांची आर्थिक मदत; प्रदेशाध्यक्ष निखिल लातूरकर यांच्या पुढाकारातून पक्षाघात आजारग्रस्त प्रमोद देशमुखांना 50 हजारांची मदत

नांदेड : संकटाच्या काळात मदतीचा हात पुढे करणे हीच खरी सामाजिक बांधिलकी मानत, नांदेड शहरातील सैनिकनगर येथील पक्षाघात आजाराने ग्रस्त असणार्‍या प्रम

बोगस दिव्यांग प्रमाणपत्र घोटाळा: पाथर्डीतील शिक्षकासह चौघे अटकेत; सोलापुरात गुन्हा दाखल
इराणचा अमेरिकेवर बुशेर अणुऊर्जा प्रकल्पाजवळ हवाई हल्ल्याचा आरोप; अमेरिका-इराण तणावामुळे जगाचे टेन्शन वाढले
अहिल्यानगर मधील सर्व ‘शिव पाणंद’च्या हद्दी निश्चित करणार : कुंभार

नांदेड : संकटाच्या काळात मदतीचा हात पुढे करणे हीच खरी सामाजिक बांधिलकी मानत, नांदेड शहरातील सैनिकनगर येथील पक्षाघात आजाराने ग्रस्त असणार्‍या प्रमोद देशमुख यांच्या कुटुंबाला परशुराम आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष कॅप्टन आशिष दामले यांच्या वतीने 50 हजार रुपयांची आर्थिक मदत देण्यात आली. अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचे प्रदेशाध्यक्ष निखिल लातूरकर यांच्या पुढाकारातून ही मदत देशमुख कुटुंबीयांपर्यंत पोहोचली आहे. आजपर्यंत नांदेड येथील गरजू कुटुंबांना आर्थिक मदत कॅप्टन आशिष दामले यांनी स्वतः पदरमोड करून दिली आहे. त्यामध्ये सौ.सरला शेष यांच्या मुलाला पायलट प्रशिक्षणासाठी दोन लक्ष रुपये, शशिकांत देशमुख यांच्या मुलाला वैद्यकीय शिक्षणासाठी एक लाख रुपये, ईशान बावसकर याला क्रिकेट प्रशिक्षणासाठी साठ हजार रुपये, संजीवनी नेरकर यांच्या पाल्याला उच्च शिक्षणासाठी एक लाख रुपये, राहेर येथील नृसिंह देवस्थान वरील पुस्तकाच्या प्रसारासाठी 50 हजार रुपये व पक्षाघाताने ग्रस्त असणार्‍या प्रमोद देशमुख यांना आर्थिक मदत म्हणून 50 हजार रुपये असे एकूण पाच लक्ष साठ हजार रुपयांची आर्थिक मदत आजपर्यंत कॅप्टन दामले यांनी केली आहे. प्रमोद देशमुख हे कुटुंबप्रमुख असून काही काळापासून पक्षाघाताने त्रस्त आहेत. त्यांच्या आजारामुळे बोलणे बंद झाले असून हात-पायही अधू झाले आहेत. सातत्याने सुरू असलेल्या वैद्यकीय उपचारांचा खर्च, औषधोपचार, घरचा दैनंदिन उदरनिर्वाह आणि पाच मुलींच्या शिक्षणाचा खर्च अशा अनेक जबाबदार्‍यांचा भार त्यांच्या कुटुंबावर आला आहे. देशमुख यांच्या कुटुंबात पत्नी वसुंधरा देशमुख आणि पाच मुली आहेत. कुटुंबाचा प्रमुखच आजारपणामुळे अंथरुणाला खिळल्याने उत्पन्नाचे साधन मर्यादित झाले. समाजातील काही दानशूर व्यक्तींनी मदतीचा हात दिला असला तरी उपचार आणि शिक्षणाचा वाढता खर्च भागविणे कुटुंबासाठी अत्यंत कठीण झाले होते. ही परिस्थिती समजल्यानंतर प्रदेशाध्यक्ष निखिल लातूरकर यांनी देशमुख कुटुंबीयांची व्यथा कॅप्टन आशिष दामले यांच्यासमोर मांडली. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन दामले यांनी तातडीने 50 हजार रुपयांची आर्थिक मदत उपलब्ध करून दिली. यासोबतच देशमुख यांच्या पाचही मुलींच्या शिक्षणासाठी आवश्यक ती विशेष शैक्षणिक मदत करण्याचे आश्वासनही देण्यात आले. आजारपणामुळे आर्थिक आणि मानसिकदृष्ट्या खचलेल्या कुटुंबाला या मदतीमुळे मोठा आधार मिळाला आहे. आर्थिक मदतीपेक्षा संकटाच्या काळात कुणीतरी आपल्यासोबत उभे आहे, ही भावना देशमुख कुटुंबासाठी अधिक मोलाची ठरली. यावेळी निखिलभाऊ लातूरकर, बाळासाहेब पांडे, राजीव देशमुख सलगरकर, कृष्णा उमरीकर,सौ. राजश्री उमरीकर, संतोष कुलकर्णी, अनिल डोईफोडे, गौरव वाळिंबे, शशिकांत पाटील, विश्वजीत चिंचपुरकर, निलेश देशपांडे, केदार देशपांडे, शशिकांत देशमुख, कृष्णा जोशी, शामसुंदर जोशी, प्रमोद बारडकर, राजू जोशी गिरीश व्यवहारे, प्रशांत मंठाळकर यांची उपस्थिती होती. या मदतीबद्दल देशमुख कुटुंबीयांनी कॅप्टन आशिष दामले आणि प्रदेशाध्यक्ष निखिल लातूरकर यांचे मनःपूर्वक आभार मानले. संकटग्रस्त कुटुंबाच्या वेदना ओळखून संवेदनशीलतेने केलेल्या या मदतीचे परिसरातूनही कौतुक होत आहे.

COMMENTS