Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

सत्ता-संघर्षाच्या निकालाआधीच घडामोडींना वेग

काँगे्रस-राष्ट्रवादीचे काही आमदार संपर्कात ः उपमुख्यमंत्री फडणवीस

मुंबई/प्रतिनिधी ः राज्यातील सत्ता-संघर्षाचा निकाल काही दिवसांत लागण्याची शक्यता आहे, त्याआधीच राज्यातील राजकीय घडामोडींनी वेग घेतला असून, उपमुख्य

अस्लम शेख यांच्या अडचणी वाढणार !
शेतकर्‍यांचे वीज कनेक्शन तोडण्याची कारवाई महावितरणने थांबवली
बा विठ्ठला ! राज्यातील जनतेला सुखी ठेव

मुंबई/प्रतिनिधी ः राज्यातील सत्ता-संघर्षाचा निकाल काही दिवसांत लागण्याची शक्यता आहे, त्याआधीच राज्यातील राजकीय घडामोडींनी वेग घेतला असून, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँगे्रस आणि राष्ट्रवादी काँगे्रसमधील आमदार संपर्कात असून, योग्य वेळी त्यांचा पक्षप्रवेश होईल, असे सूचक वक्तव्य त्यांनी केले आहे. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीदरम्यान ते बोलत होते.

यावेळी बोलतांना उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, आमदार नेहमीच संपर्कात असतात. मागच्या पाच वर्षात बघितले तर सत्ताधारी पक्ष म्हणू काम करताना अनेकांशी संबंध निर्माण झाला आहे. या संबंधामुळे आणि आत्मविश्‍वासामुळे अनेक लोक बरोबर येतात. त्यामुळे आमच्या संपर्कात अनेक जण आहेत, त्यातील किती लोक भाजपात येतील हे आज निश्‍चित सांगता येणार नाही, अशी प्रतिक्रियाफडणवीस यांनी दिली. पुढे बोलताना त्यांनी संपर्कात असलेल्या आमदारांच्या भाजपप्रवेशाच्या वेळेचाही उल्लेख केला. आमदारांबरोबर असलेल्या संपर्काचे नात्यामध्ये परिवर्तन होण्याची वेळ यायची आहे. ही वेळ निवडणुकीच्या तोंडावर येईल. असे ते म्हणाले. यावेळी बोलताना भाजपला आणखी आमदारांची गरज आहे का? असे विचारले असता, गरज कधीच संपत नसते. खरे तर आम्ही सक्षम आहोत, पण शेवटी आम्ही प्रयत्न करत राहणार, असे त्यांनी नमूद केले आहे. दरम्यान, यावेळी बोलताना त्यांनी राजकीय नेत्यांकडून होत असलेल्या बेताल वक्तव्यांवरही भाष्य केले. हा सर्व प्रकार थांबावायचा असेल तर यासाठी एक चांगला उपाय आहे. पण यासाठी माध्यमांनी जबाबदारी घ्यायला हवी. माध्यमांशी रोज सकाळी संजय राऊतांकडे जाणे बंद करावे. त्यामुळे ही समस्या निर्माण होते. जर तुम्ही त्यांच्याकडे जाणे बंद केले तर तुम्हाला राज्याचे राजकारण स्वच्छ झालेलं दिसेल, असं ते म्हणाले.

शिंदेंसारखाच राष्ट्रवादीबरोबर प्रयोग सुरू ः खा. संजय राऊत – राज्यात दोन दिवसांपासून राष्ट्रवादी काँगे्रसचे नेते अजित पवार भाजपच्या वाटेवर असल्याच्या चर्चांनी जोर धरला आहे. ईडीने राज्य सहकारी बँक घोटाळ्यात अजित पवार यांचे नाव आरोपपत्रातून वगळल्यामुळे आश्‍चर्य व्यक्त करण्यात येत असून, सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी पहाटेच्या शपथविधीचा दुसरा अंक घडल्यास नवल वाटू नये, असे वक्तव्य केले आहे. यानंतर गुरूवारी ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी  ज्याप्रमाणे एकनाथ शिंदे आणि शिंदे गटातील नेत्यांवर आधी ईडीची कारवाई करून अटकेची भीती दाखवली, तशाचप्रकारे राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांवरही ईडी कारवाई होत आहे. तोच प्रयोग राष्ट्रवादीबरोबर सुरू आहे, असा आरोप संजय राऊत यांनी केला.

भाजपकडून रणनीती तयार – राज्यातील सत्ता-संघर्षाचा निकाल बाजूने लागल्यास चांगलेच, मात्र विरोधात गेल्यास काय ? या प्रश्‍नांचे उत्तर भाजपने शोधले असून, जर शिंदे गटातील काही आमदारांची आमदारकी रद्द केल्यास, राष्ट्रवादी काँगे्रस आणि काँगे्रसमधून आमदारांना सोबत घेवून सत्ता राखायची असाच भाजपचा होरा दिसून येत आहे. त्यामुळे राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. त्यामुळे काही दिवसांपासून अजित पवार भाजपच्या वाटेवर असल्याच्या चर्चांनी जोर धरला आहे. तसेच राज्य सहकारी बँक घोटाळ्यातील आरोपपात त्यांचे नाव वगळल्याने आश्‍चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

COMMENTS