राहाता : शिर्डी येथील शासकीय विश्रामगृहात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची बैठक संपर्क अध्यक्ष नयन कदम यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. बैठकीस राहाता तालुक्यातील मनसेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी नयन कदम यांनी पक्षवाढ आणि संघटन बळकटीसाठी सातत्याने काम करण्याचे आवाहन केले. “पक्षाच्या मजबुतीसाठी मी नेहमीच अहिल्यानगर जिल्ह्यात येण्यास तयार असून, कार्यकर्त्यांनी बोलावल्यास तात्काळ उपस्थित राहीन,” असे ते म्हणाले. आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका मनसेने मोठ्या ताकदीने लढवाव्यात, अशा सूचनाही त्यांनी दिल्या. राहाता तालुका अध्यक्ष गणेश जाधव यांनी तालुक्यात पक्ष बळकट करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे सांगत, “गाव तिथे शाखा” उभारण्याचा निर्धार व्यक्त केला. येणाऱ्या निवडणुकांमध्ये मनसे प्रभावी कामगिरी करेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. बैठकीस जिल्हाध्यक्ष राजेश लुटे, बाबा शिंदे, शिर्डी शहराध्यक्ष लक्ष्मण कोतकर, विद्यार्थी सेना शहराध्यक्ष प्रशांत वाघचौरे, राहाता शहराध्यक्ष विजय मोगले, उपतालुका अध्यक्ष माऊली वाघमारे, विकी बेंद्रे, विकास म्हस्के, ऋषी साळवे, अक्षय मुर्तडक, अभी पोपळघट, ऋषी धीवर, रवी कुसळकर, पुणतांबा शहराध्यक्ष संदीप लाळे, शेतकरी सेनेचे तालुका अध्यक्ष संदीप वहाडणे, गटप्रमुख अशोक गांगड, महिला तालुकाध्यक्ष आशा शर्मा, आंबा कांबळे, भालेराव आदींसह अनेक पदाधिकारी उपस्थित होते. दरम्यान, प्रहार संघटनेतील अनेक पदाधिकाऱ्यांनी यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत प्रवेश केला. संपर्क अध्यक्ष नयन कदम यांनी त्यांचे अभिनंदन करून भविष्यात पक्षवाढीसाठी सक्रिय काम करण्याचे आवाहन केले. आभार राहाता तालुका अध्यक्ष गणेश जाधव यांनी मानले.

राहाता : शिर्डी येथील शासकीय विश्रामगृहात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची बैठक संपर्क अध्यक्ष नयन कदम यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. बैठकीस राहाता तालुक्यातील मनसेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी नयन कदम यांनी पक्षवाढ आणि संघटन बळकटीसाठी सातत्याने काम करण्याचे आवाहन केले. “पक्षाच्या मजबुतीसाठी मी नेहमीच अहिल्यानगर जिल्ह्यात येण्यास तयार असून, कार्यकर्त्यांनी बोलावल्यास तात्काळ उपस्थित राहीन,” असे ते म्हणाले. आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका मनसेने मोठ्या ताकदीने लढवाव्यात, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.
राहाता तालुका अध्यक्ष गणेश जाधव यांनी तालुक्यात पक्ष बळकट करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे सांगत, “गाव तिथे शाखा” उभारण्याचा निर्धार व्यक्त केला. येणाऱ्या निवडणुकांमध्ये मनसे प्रभावी कामगिरी करेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
बैठकीस जिल्हाध्यक्ष राजेश लुटे, बाबा शिंदे, शिर्डी शहराध्यक्ष लक्ष्मण कोतकर, विद्यार्थी सेना शहराध्यक्ष प्रशांत वाघचौरे, राहाता शहराध्यक्ष विजय मोगले, उपतालुका अध्यक्ष माऊली वाघमारे, विकी बेंद्रे, विकास म्हस्के, ऋषी साळवे, अक्षय मुर्तडक, अभी पोपळघट, ऋषी धीवर, रवी कुसळकर, पुणतांबा शहराध्यक्ष संदीप लाळे, शेतकरी सेनेचे तालुका अध्यक्ष संदीप वहाडणे, गटप्रमुख अशोक गांगड, महिला तालुकाध्यक्ष आशा शर्मा, आंबा कांबळे, भालेराव आदींसह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.
दरम्यान, प्रहार संघटनेतील अनेक पदाधिकाऱ्यांनी यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत प्रवेश केला. संपर्क अध्यक्ष नयन कदम यांनी त्यांचे अभिनंदन करून भविष्यात पक्षवाढीसाठी सक्रिय काम करण्याचे आवाहन केले. आभार राहाता तालुका अध्यक्ष गणेश जाधव यांनी मानले.

COMMENTS