Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

संगमनेरमध्ये भोंदूगिरीचा ‘दत्तधाम’ पॅटर्न फसला! वडगावपान येथे पोलिसांची मोठी कारवाई

संगमनेर : मंत्रोच्चार आणि दैवी शक्तीच्या नावाखाली दुर्धर आजार बरे करण्याचा खोटा दावा करून सर्वसामान्यांची फसवणूक करणाऱ्या परत एका भोंदू च्या मुसक

नाव्होली येथे विविध मान्यवरांचा उत्साहात सत्कार
भोंदूगिरीचा ‘दत्तधाम’ पॅटर्न फसला! वडगावपान येथे पोलिसांची मोठी कारवाई; अंनिसने उघड केला फसवणुकीचा..
नागपुरात रंगला सामना; धीरेंद्र शास्त्रींचे श्याम मानव यांना ‘या आणि चाचणी घ्या’ असं जाहीर आव्हान!

संगमनेर : मंत्रोच्चार आणि दैवी शक्तीच्या नावाखाली दुर्धर आजार बरे करण्याचा खोटा दावा करून सर्वसामान्यांची फसवणूक करणाऱ्या परत एका भोंदू च्या मुसक्या आवळण्यात आल्या. संगमनेर तालुक्यातील वडगावपान येथे ‘दत्तधाम सरकार’ नावाने दरबार भरवून फसवणूक करणाऱ्या या भोंदूविरुद्ध अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या तक्रारीनंतर ही मोठी कारवाई करण्यात आली आहे. राजेंद्र बापू गडगे असे या बंडू बाबाचे नाव आहे.
वडगावपान परिसरात स्वतःला दैवी शक्ती प्राप्त असल्याचे भासवून ‘दत्तधाम सरकार’ नावाचे यूट्यूब चॅनल सुरू केले होते. या माध्यमातून तो कर्करोगासारखे गंभीर आजार मंत्रशक्तीने बरे करणे, मूल नसलेल्या महिलांना मूल प्राप्त करून देतो तसेच घरातील विविध समस्या दूर करण्याचे खोटे दावे करत असे. या आमिषाला बळी पडून अनेक नागरिक त्याच्या दरबारात हजेरी लावत असे. याप्रकरणी संगमनेर पोलिसांनी रात्री उशिरा कारवाई करत मुख्य आरोपी भोंदू राजेंद्र गडगे आणि मधुकर शिंदे या दोघांना अटक केली असून, इतर तिघांचा शोध सुरू आहे. अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या (अंनिस) राज्य सचिव ॲड. रंजना गवांदे यांनी याप्रकरणी फिर्याद दिली. या फिर्यादीवरून संगमनेर तालुका पोलिसांनी राजेंद्र गडगेसह त्याची मुलगी ज्ञानेश्वरी गडगे, डॉ. मोहन पुरी, सुरज शिंदे आणि मधुकर शिंदे अशा पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
आरोपींवर जादूटोणा विरोधी कायदा, आयटी (IT) ॲक्ट, ड्रग्ज अँड मॅजिक रेमेडीज ॲक्ट, मेडिकल प्रॅक्टिशनर ॲक्ट आणि भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमान्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. बनावट व्हिडिओ बनवून लोकांची दिशाभूल केल्याचा ठपकाही त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक प्रवीण साळुंखे या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

COMMENTS