Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

खरिपाच्या यशस्वीततेसाठी सर्व विभागांचे प्रयत्न गरजेचे : आ.काळे; पूर्वनियोजन बैठकीत प्रशासनाला सूचना; खतटंचाई, हवामान बदलाचा आढावा

कोपरगाव : लहरी मान्सून, वाढते तापमान आणि शेतमालाच्या अनिश्चित दरामुळे शेतकरी अडचणीत असताना खरीप हंगाम यशस्वी करण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने

तिकाडे-शिंदे वस्तीपर्यंतचा शेतरस्ता अखेर खुला; शेतकर्‍यांचा समन्वय यशस्वी
राहुरी पोटनिवडणुकीत अक्षय कर्डिलेंचा 1 लाखांपेक्षा अधिक मतांनी विजय
पाथर्डी जैन समाजाच्या वतीने मधुरा भंडारींचे स्वागत

कोपरगाव : लहरी मान्सून, वाढते तापमान आणि शेतमालाच्या अनिश्चित दरामुळे शेतकरी अडचणीत असताना खरीप हंगाम यशस्वी करण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन आमदार आशुतोष काळे यांनी केले. शेतकऱ्यांना कोणतीही अडचण येऊ नये यासाठी प्रशासनाने जबाबदारीने काम करत अडचणी तात्काळ सोडवाव्यात, अशा स्पष्ट सूचना त्यांनी दिल्या.

सोमवारी (दि. २७) पंचायत समिती कार्यालयात कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांसमवेत खरीप हंगाम पूर्वनियोजन व आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी कोपरगाव विधानसभा मतदारसंघातील शेतकऱ्यांना संभाव्य अडचणी टाळण्यासाठी आवश्यक उपाययोजनांबाबत त्यांनी मार्गदर्शन केले.

खत निर्मितीसाठी लागणारा कच्चा माल परदेशातून आयात होत असल्याने जागतिक परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर खतटंचाई निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे तालुक्याला जास्तीत जास्त खतांचा कोटा मिळविण्यासाठी नियोजन करावे तसेच पुरेसा साठा उपलब्ध ठेवावा, असे निर्देश त्यांनी दिले. खत व बियाण्यांबाबत शेतकऱ्यांच्या तक्रारी गांभीर्याने घेऊन दोषींवर कडक कारवाई करावी, असेही त्यांनी स्पष्ट केले. हवामान खात्याच्या अंदाजानुसार पेरणी व कापणीबाबत शेतकऱ्यांना अचूक माहिती देणे ही प्रशासनाची जबाबदारी असल्याचे त्यांनी नमूद केले.

नैसर्गिक आपत्तीच्या काळात महसूल व कृषी यंत्रणेचे अहवाल महत्त्वाचे ठरतात. राजकीय दबावाला बळी न पडता एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही याची दक्षता घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले.

या बैठकीस उपविभागीय कृषी अधिकारी अक्षय गोसावी, गटविकास अधिकारी संदिप दळवी, नायब तहसीलदार प्रफुल्लिता सातपुते, कृषी अधिकारी मनोज सोनवणे, महाबीजचे अधिकारी, मंडळ अधिकारी, कृषी पर्यवेक्षक, सहाय्यक कृषी अधिकारी, कृषी सेवा केंद्र प्रतिनिधी तसेच शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

COMMENTS