Homeताज्या बातम्या

दादर आंदोलनात पोलिसाकडून विद्यार्थिनीचा विनयभंग? विरोधकांचा तीव्र संताप; पोलिसांनी फेटाळले आरोप

मुंबई: दादर परिसरातील आंदोलनादरम्यान एका साध्या वेशातील पोलिसाने विद्यार्थिनीला आक्षेपार्ह पद्धतीने पकडून तिचा विनयभंग केल्याचा गंभीर आरोप समोर आ

आरक्षणातील उपवर्गीकरणाच्या विरोधातील आंदोलनात हजारोंच्या संख्येने सहभागी व्हा; राजू जोगदंड यांचे आवाहन
अतिवृष्टीने देशात हाहाकार: अनेक राज्यांत मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत
दिल्लीतील CJP आंदोलनात दगडफेक; आंदोलकांना कोणी भडकवलं? अखेर पोलिसांनी शोधून काढलं, सर्वात मोठी बातमी!
Mumbai Protest Video: मुंबईतील आंदोलनात सिव्हील ड्रेसमधील पोलिसाकडून  विद्यार्थिनीचा विनयभंग? विद्यार्थ्यांमध्ये संतापाची लाट | Times Now Marathi

मुंबई: दादर परिसरातील आंदोलनादरम्यान एका साध्या वेशातील पोलिसाने विद्यार्थिनीला आक्षेपार्ह पद्धतीने पकडून तिचा विनयभंग केल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला असून राजकीय वर्तुळातून आणि विरोधकांकडून अत्यंत तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत.

व्हायरल झालेल्या व्हिडिओनुसार, आंदोलनात साध्या कपड्यात गेलेल्या एका पोलिसाने विद्यार्थिनीला अत्यंत चुकीच्या पद्धतीने धरून ठेवल्याचे व धक्काबुक्की केल्याचे दिसून येत आहे. या घटनेवर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे, आमदार रोहित पवार, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आणि इतर नेत्यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमीत महिलांशी असभ्य वर्तन करणाऱ्या या पोलीस कर्मचाऱ्याला तात्काळ निलंबित करून त्याच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी विरोधकांकडून केली जात आहे.

संबंधित पोलीस अधिकाऱ्याचे नाव आले समोर

आंदोलनातील व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर संबंधित कर्मचाऱ्याची माहिती समोर आली आहे. हे कर्मचारी शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस हवालदार दीपक बल्लाळ आहेत.

मुंबई पोलिसांकडून स्पष्टीकरण व आरोप फेटाळले

दुसरीकडे, मुंबई पोलीस आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या व्हिडिओचा बेजबाबदारपणे आणि चुकीचा अर्थ लावला जात असल्याचे सांगत विनयभंगाचे आरोप पूर्णपणे फेटाळून लावले आहेत. पोलीस प्रशासनाने दिलेल्या स्पष्टीकरणानुसार, आंदोलन संपल्यानंतर निळ्या रेनकोटमधील एक तरुण पुन्हा मुलांना आंदोलनासाठी उकसावत होता. त्यावेळी हवालदार दीपक बल्लाळ त्याला ताब्यात घेण्यासाठी गेले असता, त्याच्यासोबत असलेली तरुणी अटकाव करण्यासाठी मध्ये आली.

पोलिसांनी सांगितले की, हवालदार बल्लाळ हे दुसऱ्या दिशेला पाहत एका पुरुष आंदोलकाची कॉलर पकडत असताना ही तरुणी अचानक मध्ये आली. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी संपूर्ण घटनेची पडताळणी केली असून, व्हिडिओचे अत्यंत बारकाईने निरीक्षण करून ही वस्तुस्थिती समोर आणल्याचे मुंबई पोलीस उपायुक्त कार्यालयाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

COMMENTS