Homeताज्या बातम्या

पार्किंग ऐवजी मालमत्तेच्या हव्यासापोटी शिक्षिकेची क्रूर हत्या; मृत्यूपत्रावर जबरदस्तीने स्वाक्षरी घेऊन शेजाऱ्यांनीच रचला बनाव!

कल्याण: पैसा आणि संपत्तीच्या मोहापायी माणूस कोणत्याही थराला जाऊ शकतो, हे दाखवून देणारी धक्कादायक घटना कल्याणमध्ये उघडकीस आली आहे. मालमत्तेच्या हव

दंत आरोग्य व दंत पर्यटन क्षेत्रात महाराष्ट्राची जागतिक केंद्र बनण्याची क्षमता: डॉ. राजेश गवांदे
‘वृद्धेश्वर’वर आ. राजळेंची तर ‘मुळा’वर गडाखांची एकहाती सत्ता; साखर कारखाना निवडणुकीत सत्ताधाऱ्यांचे निर्विवाद वर्चस्व
सालेवडगावमध्ये कृषीदूतांचे उत्साहात स्वागत
Kalyan Teacher Murder Case; Property Dispute Leads To Brutal Killing

कल्याण: पैसा आणि संपत्तीच्या मोहापायी माणूस कोणत्याही थराला जाऊ शकतो, हे दाखवून देणारी धक्कादायक घटना कल्याणमध्ये उघडकीस आली आहे. मालमत्तेच्या हव्यासापोटी एका ५३ वर्षीय अविवाहित शिक्षिका व विमा एजंटची अत्यंत थंड डोक्याने हत्या करण्यात आल्याचे निष्पन्न झाले आहे. हत्येपूर्वी आरोपींनी महिलेला जबरदस्तीने मृत्यूपत्रावर स्वाक्षरी करण्यास भाग पाडले आणि त्यानंतर गळा आवळून हत्या करत मृतदेह महामार्गालगत फेकून दिला. या प्रकरणी पोलिसांनी तांत्रिक पुराव्यांच्या आधारे तीन आरोपींना अटक केली असून मुख्य सूत्रधार मृत महिलेचे शेजारीच असल्याचे समोर आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, संगीता चंदनशिवे (वय ५३) असे मृत महिलेचे नाव आहे. त्या आंबिवली येथील रहिवासी असून एका शाळेत शिक्षिका म्हणून कार्यरत होत्या, तसेच विमा एजंट म्हणूनही काम करायच्या. त्या अविवाहित असल्याने आणि त्यांच्याकडे बरीच मालमत्ता असल्याने शेजाऱ्यांचा त्यांच्या संपत्तीवर डोळा होता. १५ जुलै रोजी चंदनशिवे यांचा मृतदेह मुंबई–नाशिक महामार्गालगत सिन्नर–घोटी मार्गावरील एसएमबीटी मेडिकल कॉलेजजवळ आढळून आला होता. नाशिकच्या वाडीवऱ्हे पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद झाली होती, तर त्या बेपत्ता झाल्याची तक्रार कल्याणच्या कोळसेवाडी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली होती.

विमा पॉलिसीच्या बहाण्याने बोलावून घेतला जीव

या प्रकरणी दिगंबर आव्हाड (४८), तुषार रत्नपारखी (५२), रमेश पांडे आणि नाशिकमधील संतोष जाधव अशी आरोपींची नावे समोर आली आहेत. यातील आव्हाड आणि रत्नपारखी हे चंदनशिवे यांचे शेजारी असून त्यांना शिक्षिकेच्या आर्थिक परिस्थितीची पूर्ण कल्पना होती. आरोपींनी विमा पॉलिसी खरेदी करण्याच्या बहाण्याने संगीता यांना आसनगाव येथील एका भाड्याच्या फ्लॅटमध्ये बोलावले. तेथे त्यांना धमकावून आव्हाड आणि रत्नपारखी यांना कायदेशीर वारस घोषित करणाऱ्या मृत्यूपत्रावर जबरदस्तीने स्वाक्षरी करून घेतली. त्यानंतर गळा आवळून हत्या करत पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह महामार्गावर फेकून दिला.

तपासादरम्यान मृत शिक्षिकेच्या एटीएम कार्डचा वापर करून पैसे काढण्यात आल्याचे समोर आले. पोलिसांनी सीसीटीव्ही आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे सूत्र हलवत संतोष जाधव याच्यासह तिघांना बेड्या ठोकल्या. चौकशीत आरोपींनी मालमत्तेवर ताबा मिळवण्यासाठीच हा कट रचल्याची कबुली दिली आहे. पोलीस सध्या या प्रकरणातील फरार चौथ्या आरोपीचा शोध घेत असून सखोल तपास सुरू आहे.

COMMENTS