Homeताज्या बातम्या

अतिवृष्टीने देशात हाहाकार: अनेक राज्यांत मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत

नवी दिल्ली : देशाच्या विविध भागांत पावसाचा जोर कायम असून, अनेक ठिकाणी मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. राजस्थान, मध्य प्रदेश, छत

विदर्भात पावसाचा हाहाकार! यवतमाळात कुपटी नदीच्या पुरात कारसह ३ जण वाहून गेले; अमरावतीत ढगफुटीसदृश पाऊस
आधुनिक भारताच्या विकासात शेती हा विकासाचा पाया; जिरेवाडी येथे कुलगुरू प्रो. डॉ. इंद्रमणी यांचे प्रतिपादन
श्रीदत्त मंदिरात गुरुपौर्णिमा उत्सवाची जय्यत तयारी; २९ जुलै रोजी मुख्य सोहळा, विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन

नवी दिल्ली : देशाच्या विविध भागांत पावसाचा जोर कायम असून, अनेक ठिकाणी मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड, उत्तर प्रदेश, आसाम आणि महाराष्ट्रातील काही भागांत अतिवृष्टीसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. पाऊस आणि भूस्खलनाचा धोका लक्षात घेऊन अमरनाथ यात्रा तात्पुरती थांबवण्यात आली असून रविवारी राजधानीत चांगल्याच पावसाने हजेरी लावली.

राजस्थानची राजधानी जयपूरमध्ये रविवारी सकाळी सहा ते नऊ या तीन तासांच्या कालावधीत जोरदार पाऊस झाला. सततच्या पावसामुळे शहरातील सखल भागांमध्ये तीन ते चार फूट पाणी साचले. अनेक घरांमध्ये पाणी शिरल्याने नागरिकांची मोठी गैरसोय झाली. चुरू जिल्ह्यातील काही वस्त्यांमध्येही पाणी शिरल्याने परिस्थिती गंभीर झाली आहे.

मध्य प्रदेशातील डिंडोरी जिल्ह्यात शनिवारी रात्री नऊपासून रविवारी सकाळी सहापर्यंत सुमारे सहा इंच पावसाची नोंद झाली. मुसळधार पावसामुळे नर्मदा नदीच्या पाणीपातळीत वाढ झाली असून, नदीवरील पुलावरून पाणी वाहत असल्याचे चित्र आहे. राजस्थान आणि मध्य प्रदेशातील काही भागांत आजही मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

दिल्लीत पावसाने यंदाच्या ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीलाच जोरदार हजेरी लावली आहे. ऑगस्टच्या पहिल्या आठ दिवसांत राजधानीत २३०.१ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. ऑगस्ट महिन्याची सरासरी पर्जन्यमानाची मात्रा २२६.८ मिलीमीटर आहे. त्यामुळे अवघ्या आठ दिवसांतच महिन्याच्या सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला आहे. २०२४ नंतर ऑगस्ट महिन्यातील हा सर्वाधिक पाऊस असल्याचे सांगितले जात आहे. मुसळधार पावसामुळे दिल्लीतील अनेक भागांत पाणी साचले. कालिंदी कुंज सीमाभाग, आयटीओ, प्रेस एन्क्लेव्ह मार्ग यांसह प्रमुख रस्त्यांवर मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी झाली. अनेक ठिकाणी वाहनचालकांना पाण्यातून मार्ग काढावा लागला.

COMMENTS