Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पेट्रोलपंपांवरील क्यूआर कोड घोटाळा उघड; नांदेड सायबर पोलिसांची धडक कारवाई; 3 आरोपी जेरबंद, 9.31 लाखांचा मुद्देमाल जप्त

नांदेड : पेट्रोलपंपांवर ऑनलाईन व्यवहाराच्या नावाखाली ग्राहकांची फसवणूक करणार्‍या सायबर टोळीचा नांदेड सायबर पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या प्रकरण

जिम ट्रेनर बनला भोंदू बाबा; अंगात देवी येत असल्याचा बनाव करून लोकांकडून उकळले पैसे आणि महागडी दारू!
राहुरीत गावठी कट्ट्यासह दोघे जेरबंद; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई; पाच लाखांचा मुद्देमाल जप्त
28 लाखांच्या लाचप्रकरणी महिला पोलिस अधिकारी निलंबित
man uses QR code to steal money from petrol pump arrest कैसे शख्स ने पेट्रोल  पंप में लगे QR कोड से चुराए हजारों रुपए, फिर हुआ ये अंजाम, India News in  Hindi -

नांदेड : पेट्रोलपंपांवर ऑनलाईन व्यवहाराच्या नावाखाली ग्राहकांची फसवणूक करणार्‍या सायबर टोळीचा नांदेड सायबर पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या प्रकरणी तीन आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून चारचाकी वाहन, पाच भ्रमणध्वनी, रोख रक्कम असा एकूण 9 लाख 31 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या कारवाईमुळे जिल्ह्यात खळबळ उडाली असून सायबर गुन्हेगारांविरोधात पोलिसांनी कठोर भूमिका घेतल्याचे स्पष्ट झाले आहे.
सायबर पोलीस ठाणे, नांदेड येथे गुन्हा क्रमांक 195/2026 अंतर्गत भारतीय न्याय संहितेच्या कलम 318(4), 3(5) तसेच माहिती तंत्रज्ञान अधिनियम 2000 मधील कलम 66(ड) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 21 एप्रिल 2026 रोजी पहाटे मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी तातडीने तपास सुरू करून अल्पावधीतच गुन्ह्याचा उलगडा केला. तपासादरम्यान आरोपी पेट्रोलपंपांवर येणार्‍या ग्राहकांना ऑनलाईन देयक करण्यास प्रवृत्त करत होते. मात्र, मूळ क्यूआर कोडऐवजी बनावट क्यूआर कोड वापरून ग्राहकांकडून पाठवली जाणारी रक्कम स्वतःच्या खात्यात वळवली जात असल्याचे उघड झाले. व्यवहार यशस्वी झाल्याचा भास निर्माण करून आरोपी घटनास्थळावरून पसार होत असत. या प्रकारामुळे अनेक नागरिकांची आर्थिक फसवणूक झाल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.
पोलीस अधीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली सायबर पोलीस निरीक्षक वसंत सप्रे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने तांत्रिक तपास, भ्रमणध्वनी स्थान शोध, डिजिटल व्यवहारांची पडताळणी आणि गुप्त माहितीच्या आधारे आरोपींचा माग काढला. या कारवाईत पोलीस अंमलदार दीपक ओढणे, विलास राठोड, अविनाश ढोके, दावीद पिडगे, काशिनाथ कारखेडे आणि ज्ञानेश्‍वर यन्नावार यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. तक्रारदार शेख मसूद शेख अब्दुल रशीद यांच्या फिर्यादीवरून अल्ताफ सरवर आतार (वय 23, रा. घुळा, कामारेड्डी), योगेश उत्तम पांचाळ (वय 26, रा. कामारेड्डी) आणि तौफिक अशरफ शेख (वय 23, रा. जालना, सध्या पुणे) यांना अटक करण्यात आली आहे. आरोपींकडून जप्त करण्यात आलेल्या भ्रमणध्वनीतील डिजिटल माहितीची तपासणी सुरू असून राज्यातील इतर जिल्ह्यांतही या टोळीचे जाळे कार्यरत असल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.
नागरिकांनी ऑनलाईन व्यवहार करताना अधिक सतर्क राहावे, क्यूआर कोड स्कॅन करण्यापूर्वी खातरजमा करावी, अनोळखी व्यक्तींच्या सांगण्यावरून व्यवहार टाळावेत तसेच संशयास्पद प्रकार आढळल्यास तात्काळ सायबर पोलिसांकडे तक्रार नोंदवावी, असे आवाहन पोलिस प्रशासनाने केले आहे. सायबर गुन्ह्यांविरोधातील ही कारवाई नांदेड पोलिसांसाठी मोठे यश मानले जात असून डिजिटल फसवणूक करणार्‍यांना कठोर शिक्षा मिळवून देण्याचा इशाराही प्रशासनाने दिला आहे.

COMMENTS