Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

एसटी बस अपघातात 4 जणांचा मृत्यू; अहिल्यानगरच्या दिशेने येतांना माळशेज घाटात अपघात

मुरबाड : मुरबाड-माळशेज घाट महामार्गावर मंगळवारी सकाळी झालेल्या भीषण अपघाताने परिसर हादरला. वैशाखरे वळणाजवळ राज्य परिवहन बस आणि चारचाकी वाहन यांच्

उत्तरप्रदेशातील आंबेडकरनगर जिल्ह्यात अपघातातील जखमींना मदत करणार्‍यांनाच चिरडले, 8 जणांचा मृत्यू
नगर-मनमाड महामार्गावर भीषण अपघातएसटी बस – कारच्या अपघातात तिघे गंभीर
पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांचे मानवतेचे दर्शन; अपघातग्रस्तांना तत्काळ मदत
माळशेज घाटातील भीषण अपघातात चौघांचा जागीच मृत्यू; धोकादायक वळणावर एसटी-स्कॉर्पिओची  समोरासमोर धडक | Saamana (सामना)

मुरबाड : मुरबाड-माळशेज घाट महामार्गावर मंगळवारी सकाळी झालेल्या भीषण अपघाताने परिसर हादरला. वैशाखरे वळणाजवळ राज्य परिवहन बस आणि चारचाकी वाहन यांच्यात झालेल्या समोरासमोर धडकेत चार जणांचा जागीच मृत्यू झाला, तर चार जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींमध्ये दोन लहान मुलांचाही समावेश असल्याने अपघाताचे गांभीर्य अधिक वाढले आहे.
माहितीनुसार, विठ्ठलवाडी आगारातून सकाळी सुमारे साडेआठ वाजता कल्याणमार्गे अहिल्यानगरकडे जाणारी राज्य परिवहन बस नियमानुसार मार्गक्रमण करत होती. बस मुरबाड तालुक्यातील टोकावडे-वैशाखरे हद्दीतील धोकादायक वळणाजवळ पोहोचली असताना समोरून वेगात येणार्‍या चारचाकी वाहनाशी तिची जोरदार धडक झाली. हा अपघात इतका भीषण होता की दोन्ही वाहनांच्या पुढील भागाचा पूर्णपणे चुराडा झाला. धडकेनंतर घटनास्थळी मोठा गोंधळ उडाला. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी तत्काळ धाव घेत बचावकार्य सुरू केले. जखमींना वाहनातून बाहेर काढण्यासाठी मोठ्या प्रयत्नांची गरज भासली. त्यानंतर त्यांना तातडीने जवळच्या शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले. काहींची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते. घटनेची माहिती मिळताच पोलिस आणि आपत्कालीन पथके घटनास्थळी दाखल झाली. पोलिसांनी परिसर ताब्यात घेऊन वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न केला. अपघातग्रस्त वाहनांची पाहणी करून पंचनामा करण्यात आला. प्राथमिक माहितीनुसार, वैशाखरे वळणाजवळ पुढे जाण्याचा प्रयत्न करताना वाहनचालकाचा ताबा सुटल्याने हा अपघात घडल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. मात्र, नेमके कारण स्पष्ट होण्यासाठी सखोल तपास सुरू आहे. मृतांची ओळख पटवण्याचे काम सुरू असून मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून, घाटमाथ्यावर सुरक्षित वाहनचालना आणि नियमांचे पालन करण्याची गरज पुन्हा अधोरेखित झाली आहे.

COMMENTS