Homeताज्या बातम्या

शिक्षणमंत्री दादाजी भुसे यांचा सत्कार; बीड जिल्ह्यातील शाळांच्या प्रलंबित प्रश्नांवर सविस्तर चर्चा

बीड: शिवसेनेचे अल्पसंख्याक बीड जिल्हाप्रमुख मोहम्मद अझरुद्दीन (ए.एस. गोलू) यांनी मुंबई येथील मंत्रालयात राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे

स्व. अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त इंदिरा गांधी पॉलिटेक्निकमध्ये वृक्षारोपण
रस्ते की पार्किंग? नांदेडची वाहतूक कोंडीत गुदमरली; कोचिंग क्लासेस, बेशिस्त पार्किंग आणि निष्क्रिय यंत्रणेवर प्रश्नचिन्ह!
विजेचा शॉक लागून १४ वर्षीय मुलाचा जागीच मृत्यू; राहुरी तालुक्यातील सडे येथील हृदयद्रावक घटना

बीड: शिवसेनेचे अल्पसंख्याक बीड जिल्हाप्रमुख मोहम्मद अझरुद्दीन (ए.एस. गोलू) यांनी मुंबई येथील मंत्रालयात राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांची सदिच्छा भेट घेऊन पुष्पगुच्छ देत त्यांचा सत्कार केला.

या भेटीदरम्यान बीड जिल्ह्यातील शिक्षण क्षेत्राशी संबंधित विविध प्रलंबित प्रश्नांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. विशेषतः ग्रामीण भागातील गाव, खेडी व वस्तीवरील जिल्हा परिषद शाळांच्या जीर्ण व धोकादायक इमारतींचा प्रश्न प्राधान्याने मांडण्यात आला. अनेक शाळांच्या इमारती मोडकळीस आल्यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला असून अशा शाळांच्या दुरुस्ती व नव्या इमारतींसाठी तातडीने निधी उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली.

यावेळी बीड जिल्ह्यातील शैक्षणिक सुविधा अधिक सक्षम करण्यासाठी आवश्यक उपाययोजना राबविणे, विद्यार्थ्यांना सुरक्षित व दर्जेदार शिक्षणाचे वातावरण उपलब्ध करून देणे, तसेच प्रलंबित विकासकामांना गती देण्याबाबतही चर्चा झाली. शिक्षणमंत्री दादाजी भुसे यांनी मांडलेल्या प्रश्नांची सकारात्मक दखल घेत संबंधित बाबींचा आढावा घेऊन आवश्यक ती कार्यवाही करण्यात येईल, असे आश्वासन दिल्याची माहिती मोहम्मद अझरुद्दीन (ए.एस. गोलू) यांनी दिली.

COMMENTS