अकोले : माळीझाप (ता. अकोले) येथे संत शिरोमणी सावता महाराज पुण्यतिथी निमित्त ६७ वा अखंड हरिनाम सप्ताह, ह.भ.प. विठ्ठलपंत महाराज गोंडे व श्रीमान महं

अकोले : माळीझाप (ता. अकोले) येथे संत शिरोमणी सावता महाराज पुण्यतिथी निमित्त ६७ वा अखंड हरिनाम सप्ताह, ह.भ.प. विठ्ठलपंत महाराज गोंडे व श्रीमान महंत बाबाजी सेवादासजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली मंगळवार (दि. ४) पासून मोठ्या उत्साहात सुरू होत आहे.
योगी केशव बाबा चौधरी, ह.भ.प. दीपक महाराज देशमुख, ॲड. के. डी. धुमाळ, ह.भ.प. सुरेश महाराज भालेकर, रघुनाथ बाबा माने, ह.भ.प. चंद्रकांत महाराज चौधरी आणि एकनाथ पांडे यांच्या हस्ते घटस्थापना व वीणा पूजन पार पडणार आहे. ज्ञानेश्वरी पारायण व्यासपीठ प्रमुख म्हणून ह.भ.प. पारधी, ह.भ.प. गोरक्षनाथ वेलजाळी, ह.भ.प. राजेंद्र देशमुख व ह.भ.प. रतनबाई नवले हे काम पाहणार आहेत.
सप्ताहाच्या काळात दररोज पहाटे ४ ते ६ काकडा भजन, सकाळी ७ ते १० ज्ञानेश्वरी पारायण, दुपारी २ वाजता गाथा भजन, सायंकाळी ६ ते ७ हरिपाठ, रात्री ७ ते ९ हरिकीर्तन आणि रात्री ११ नंतर भजन व जागर असा दैनंदिन धार्मिक कार्यक्रम असणार आहे. या सप्ताहात ह.भ.प. अनिल मंडलिक, ह.भ.प. नितीन गोडसे, ह.भ.प. कु. सायली घोरवडकर, ह.भ.प. उषा आळंदीकर, ह.भ.प. गोविंद करंजकर, ह.भ.प. आदिनाथ आंधळे (पाथर्डी) आणि ह.भ.प. मदन वर्पे यांची कीर्तनसेवा होणार आहे.
मंगळवार, दि. ११ ऑगस्ट रोजी दुपारी १ ते ४ वाजेपर्यंत संत सावता महाराजांच्या प्रतिमेची सवाद्य मिरवणूक काढण्यात येणार असून, सायंकाळी ५ ते ७ या वेळेत ह.भ.प. राजेंद्र सदगीर यांचे काल्याचे कीर्तन होईल. या धार्मिक सोहळ्याचा व कीर्तनसेवेचा भाविकांनी मोठ्या संख्येने लाभ घ्यावा, असे आवाहन माळीझाप व अकोले ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले आहे.

COMMENTS