Homeताज्या बातम्याविदेश

कॅनडामध्ये भारतीय वंशाच्या तरुणाची हत्या

नवी दिल्ली : कॅनडामध्ये भारतीय वंशाच्या दिलराज सिंग गिल या तरुणाची गोळीबारात हत्या झाल्याची घटना उघडकीस आली आहे. ही हत्या लक्ष्यित गँग वॉरचा भाग असण्य

लालूप्रसाद यादव आणि ६० टक्के मतदानाचा अर्थ !
महिला पोलिस कर्मचार्‍याचा लोकलमधून पडून मृत्यू
गेवराई तालुक्यातील मादळमोही येथे रंगनाथ महाराज संस्थानास खासदार बजरंग बाप्पा सोनावणे यांची सदिच्छा भेट

नवी दिल्ली : कॅनडामध्ये भारतीय वंशाच्या दिलराज सिंग गिल या तरुणाची गोळीबारात हत्या झाल्याची घटना उघडकीस आली आहे. ही हत्या लक्ष्यित गँग वॉरचा भाग असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.

ही घटना कॅनडातील ब्रिटिश कोलंबिया प्रांतात घडली असून पोलिसांनी मृत तरुणाची ओळख व्हॅन्कुव्हर येथील रहिवासी दिलराज सिंग गिल अशी जाहीर केली. तो भारतीय मूळचा असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे. बर्नाबी आरसीएमपी (रॉयल कॅनेडियन माउंटेड पोलिस)च्या अधिकार्‍यांना 3700 ब्लॉक परिसरात गोळीबार झाल्याची माहिती मिळताच त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. तेथे एक व्यक्ती गंभीर जखमी अवस्थेत आढळून आली. पोलिसांनी त्याचे प्राण वाचवण्यासाठी प्रयत्न केले; मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. या घटनेनंतर काही वेळातच बक्सटन स्ट्रीटच्या 5000 ब्लॉक परिसरात एक वाहन जळताना आढळून आले. या जळालेल्या वाहनाचा गोळीबाराच्या घटनेशी काही संबंध आहे का, याचा तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणाचा तपास सध्या इंटीग्रेटेड होमिसाइड इन्व्हेस्टिगेशन टीमकडे सोपवण्यात आला आहे.

COMMENTS