Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

सृजन-2023,विविध शाखेतील विविध प्रकारच्या परीक्षा संपन्न

श्री बालाजी शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने सृजन-2023चे यशस्वी आयोजन

अंबाजोगाई प्रतिनिधी - अंबाजोगाई शहरातील श्री बालाजी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित कॉलेज ऑफ कॉम्प्युटर सायन्स अँड आय. टी. अंबाजोगाई यांच्या वतीने अं

देशात महागाई आणि बेरोजगारीचा उच्चांक
आमगाव तालुक्यातील आठ गावांना मध्यप्रदेशला विलीनीकरणाची नागरिकांची मागणी 
वंचित बहुजन आघाडीचे मराठवाडा अध्यक्ष अशोक हिंगे पाटील यांची लातुर जिल्हा प्रभारी पदी निवड

अंबाजोगाई प्रतिनिधी – अंबाजोगाई शहरातील श्री बालाजी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित कॉलेज ऑफ कॉम्प्युटर सायन्स अँड आय. टी. अंबाजोगाई यांच्या वतीने अंबाजोगाई शहरातील बी.सी.ए. ,बी.सी.एस. ,बी.ए. ,बी. एस्सी, बी.कॉम च्या सर्व विद्यार्थ्यांसाठी खुल्या स्पर्धेचे अर्थात सृजन -2023 चे आयोजन दिनांक 13 ते 15 मार्च रोजी करण्यात आले होते.
 शहरातील विविध 5 महाविद्यालयातील विविध शाखेच्या पदवीच्या विद्यार्थ्यासाठी आय टी विक चे आयोजन कॉलेज ऑफ कॉम्प्युटर सायन्स अँड आय टी अंबाजोगाई यांच्या वतीने अंबाजोगाई शहरातील मोदी लर्निंग सेंटर रिंग रोड अंबाजोगाई या ठिकाणी यशस्वी रित्या करण्यात आले होते. या उपक्रमाला विद्यार्थ्यांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. आय. टी. विक चा उद्घाटन सोहळा दिनांक 13 मार्च 2023 रोजी आर.डी. जोशी निवृत्त प्राचार्य योगेश्वरी महाविद्यालय अंबाजोगाई आणि डॉ डी. एच. थोरात प्रशासकीय अधिकारी बालाजी – शिक्षण प्रसारक मंडळ यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न करण्यात आला. या प्रसंगी आर. डी. जोशी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना भविष्यातील करीअर च्या विविध संघी बद्दल माहिती दिली. तसेच तंत्रज्ञान हा मानव जीवनाचा एक अविभाज्य घटक बनत असल्याचे देखील   नमुद केले. आर. डी. जोशी यांच्या मार्गदर्शनातुन विद्यार्थ्यांना प्रेरणा तसेच एक नवी दिशा प्राप्त झाली. त्यांनी कॉलेज ऑफ कॉम्प्युटर सायन्स अँड आय टी यांनी आयोजित केलेल्या या उपक्रमाचे विशेष कौतुक केले. अशा प्रकारचा अंबाजोगाई शहरातील हा पहीलाच उपकम असल्याचे सांगत संस्थापक राजकिशोर मोदी, संचालक संकेत मोदी व त्यांच्या संपूर्ण शैक्षणिक टीमचे अभिनंदन व कौतुक केले. असेच उपक्रम यापुढेही राबविण्यात यावेत अशी अपेक्षा व्यक्त केली. डॉ डी. एच. थोरात यांनी कॉलेज ऑफ कॉम्प्युटर सायन्स अँड आयटी स्थापना आणि या ठिकाणी सुरू असलेल्या विविध कोर्सेस ची माहीती  दिली.  आजच्या पीढीतील विद्यार्थ्यांनी फक्त नोकरीच्या मागे न लागता विविध  तांत्रिक कोर्सेस करून आपल्या आयुष्यास एक नवीन वळण देऊन जीवनात यशस्वी होणे आवश्यक आहे असे प्रतिपादन थोरात यांनी केले. कॉलेज ऑफ कॉम्प्युटर सायन्स अँड आय.टी यांनी घेतलेल्या आय. टी. वीक अंतर्गत दिनांक 14 मार्च रोजी पोस्टर प्रेझेंटेशन आणि प्रोग्रॅमिंग स्पर्धा आयोजित केली होती. या स्पर्धेचे उद्घाटन श्री बालाजी शिक्षण प्रसारक मंडळाने कार्यकारी संचालक संकेत मोदी यांच्या हस्ते करण्यात आले. त्यांनी विद्यार्थ्यांना विविध विषयांवर बोलते करत भविष्यात उपलब्ध होत असलेल्या संधीकडे डोळसपणे कसे पाहता येईल आणि त्यासाठी आपल्या अभ्यासकमाचा तसेच अशा प्रकारच्या स्पर्धांचा कसा वापर करता येईल  याकडे पहावे असे अधोरेखित केले . विद्यार्थ्यांना अशा प्रकारच्या मान्यवरांचे या प्रसंगी मार्गदर्शन प्राप्त झाल्याने विद्यार्थी उत्साहीत झाले. विद्यार्थ्यांनी ग्रुप ए आणि ग्रुप बी अंतर्गत 5 वायरलेस टेक्नॉलॉजी व्हॉटस अप फिचर्स ब्ल्यु बेन, अँड्रॉइड अप्लिकेशन , सायबर क्राईम इन बैंकिंग सेक्टर टेक्नॉलॉजी चे जीवनातील महत्व विषद केले. कोव्हीड या जागतीक महामारीमुळे देशाच्या अर्थव्यवस्थेवर झालेला परीणाम, महीला सक्षमीकरण आदी विषयांवर मराठी तसेच इंग्रजी भाषेत उत्तम सादरीकरण केले. पोस्टर प्रेझेंटेशन स्पर्धेचे परीक्षण एस.आर.टी. महाविद्यालयाचे प्राध्यापक डॉ सागर कुलकर्णी आणि जोधाप्रसादजी मोदी उच्च माध्यमिक विद्यालयाचे सहशिक्षक विनायक मुंजे यांनी केले. दिनांक 15 मार्च रोजी याच उपक्रमा अंतर्गत विद्यार्थ्यांच्या सांस्कृतिक महोत्सव तसेच फॅन्सी ड्रेस चे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये विविध पोशाख परिधान करून विद्यार्थ्यांनी आपला सहभाग नोंदवला होता . या स्पर्धांचा बक्षिस वितरण सोहळा टी बी गिरवलकर पोलिटिकल महाविद्यालयाचे प्राचार्य एम. बी. शेट्टी यांच्या उपस्थितीत  संपन्न झाला. सर्व विजयी स्पर्धकांना श्री बालाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक राजकिशोर मोदी, अध्यक्ष भूषण मोदी, प्राचार्य डॉ.बी.आय. खडकभावी, प्रा वसंत चव्हाण, बिराजदार सुरेश, राघवेंद्र राजमाने यांनी शुभेच्छा दिल्या. सृजन -2023 यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ .चव्हाण बी. आर. तसेच पर्यवेक्षक डॉ. परदेशी, टी.जी, कोदरकर बी.एम, बोराडे एस.एस, हिंगणगावकर वैभव, सिध्दिकी आय.डी, तन्वी कमळकर, गुर्जर स्वाती तसेच विद्यार्थी समन्वयक आणि सर्व विद्यार्थ्यांनी यांनी परीश्रम घेतले.

COMMENTS