Homeताज्या बातम्याक्रीडा

दुसऱ्या सुपर ओव्हरमध्ये भारताचा थरारक विजय

भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील तिसरा आणि  अखेरचा टी 20 सामना अतिशय थरारक असाच ठरला. भारतासमोर नवख्या असणाऱ्या अफगाणिस्तानने जोरदार टक्कर दिली त्

पाटण तालुक्याचा सुपूत्र कमांडो सुरज शेवाळे याने फडकविला 22 हजार फुटांवर तिरंगा
मेस्सीला रोनाल्डो पेक्षाही दुप्पट रकमेची ऑफर
पाकिस्तानने क्रिकेट सामना जिंकल्यावर खाल्ला मार…आफगानिस्थानने धु धु धुतलं.

भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील तिसरा आणि  अखेरचा टी 20 सामना अतिशय थरारक असाच ठरला. भारतासमोर नवख्या असणाऱ्या अफगाणिस्तानने जोरदार टक्कर दिली त्यामुळे 212 टार्गेट देऊनही टीम इंडियाची चांगलीच दमछाक झाली. सामना टाय झाला. त्यानंतर सुपर ओव्हरचा खेळ सुरू झाला. यामध्ये पहिली ओव्हर टाय झाली दुसऱ्या ओव्हरमध्ये मात्र भारताने बाजी मारली आणि शेवटचा सामन खिशात टाकत अफगाणिस्तानला व्हाईटवॉश दिला. या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करत 212 धावा केल्या होत्या. भारताच्या डावात कर्णधार रोहित शर्माने चमकदार फलंदाजी करत शतक ठोकले. त्यानंतर आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या अफगाणिस्ताननेही चांगली टक्कर दिली. अफगाणिस्तानने 6 खेळाडूंच्या मोबदल्यात 212 धावा करत सामना अनिर्णित ठेवला होता.

यानंतर सुपर ओव्हरच्या नियमाने खेळ पुन्हा सुरू करण्यात आला. पहिल्या सुपर ओव्हरमध्ये दोन्ही संघांनी 16-16 अशा सारख्याच धावा केल्या. त्यामुळे दुसरी सुपर ओव्हर घेण्यात आली. या ओव्हरमध्ये भारताने दोन विकेट गमावत फक्त 11 धावा केल्या होत्या. मात्र, रवी बिश्नोईच्या फिरकीत अफगाण फलंदाज अडकले. रवी बिश्नोईने प्रतिस्पर्धी संघाचे दोन फलंदाज टिपले.

दरम्यान, या सामन्यात रोहित शर्मा आणि रिंकू सिंग यांनी जबरदस्त खेळी केली. रोहित आणि रिंकूमध्ये 95 चेंडूत 190 धावांची भागीदारी झाली. रोहितने 69 चेंडूत 11 चौकार आणि 8 षटकारांसह 121 धावांची खेळी केली. तर रिंकू सिंगने अवघ्या 39 चेंडूत 69 धावा केल्या. रिंकूने त्याच्या इनिंगमध्ये 2 चौकार आणि 6 षटकार मारले. एकवेळ 22 धावांवर चार विकेट पडूनही टीम इंडियाने 20 षटकांत 4 गडी गमावून 212 धावा केल्या. भारतीय संघाने शेवटच्या पाच षटकात 100 हून अधिक धावा केल्या. रोहित शर्मा तिसर्‍या T20 मध्ये 121 धावांची तुफानी इनिंग खेळला. रोहितच्या T20 कारकिर्दीतील हे पाचवे शतक होते. रोहितने फॉरमॅटमध्ये सर्वाधिक शतके झळकावण्याचा विक्रम केला. याशिवाय, रिंकूने धुवांधार 69 धावा केल्या.

COMMENTS