Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पुण्यात व्यावसायिकांना धमकावणारे खंडणीखोर अटकेत

पुणे/प्रतिनिधी ः पुण्यामध्ये व्यावसायिकांना धमकावणारे खंडणीखोरांच्या अनेक घटना समोर आल्या असतांना, लक्ष्मी रोडवरील व्यावसायिकाला धमकावणार्‍या खंड

दीपक करगळ यांची 5 हजार किलो आंब्यांची साई प्रसालयात देणगी
Sameer Wankhede यांचे कास्ट प्रमाणपत्र तपासन्याचे आदेश (Video)
थोरात महाविद्यालयात राष्ट्रीय शैक्षणिक धोरण कार्यशाळा उत्साहात

पुणे/प्रतिनिधी ः पुण्यामध्ये व्यावसायिकांना धमकावणारे खंडणीखोरांच्या अनेक घटना समोर आल्या असतांना, लक्ष्मी रोडवरील व्यावसायिकाला धमकावणार्‍या खंडणीखोरांना पोलिसांनी ताब्यात घेतल्यामुळे खळबळ उडाली आहे. लक्ष्मी रस्त्यावरील एका कपडे विक्री करणार्‍या व्यावसायिकाला धमकावून खंडणी उकळणार्‍या एकास अटक करण्यात आली. या प्रकरणी साथीदारांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कापड व्यावसायिकाला खंडणी मागणार्याला बेड्या घालण्यात आल्या आहेत.

रवींद्र पीरप्पा कांबळे (वय 36, रा. बुधवार पेठ) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. या प्रकरणी कांबळेचे साथीदार आकाश कासट, जमीर कदम यांच्यासह साथीदारांच्या विरोधात गुन्हादाखल करण्यात आला आहे. याबाबत 28 वर्षीय व्यावसायिकाने फिर्याद दिली आहे. फिर्यादीचा कपडे विक्रीचा व्यवसाय आहे. त्याने आरोपींकडून सात लाख रुपये व्याजाने घेतले होते. त्या बदल्यात व्यावसायिकाने आरोपींना एकूण 13 लाख 62 हजार रुपये परत केले होते. त्यानंतर आरोपींनी फिर्यादीकडे 13 लाख 50 हजारांची मागणी केली. पैसे न दिल्यास व्यावसायिक आणि त्याच्या कुटुंबीयांना जीवे मारण्याची धमकी दिली. व्यावसायिकाने याबाबत खंडणी विरोधी पथक एकचे पोलीस निरीक्षक अजय वाघमारे यांच्याकडे तक्रार अर्ज दिला. त्यानंतर खंडणी विरोधी पथकाने कारवाई करुन कांबळे याला अटक केली असून त्याच्या बरोबर असलेल्या साथीदारांचा शोध घेण्यात येत आहे. अतिरिक्त पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, उपायुक्त अमोल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अजय वाघमारे, सहायक निरीक्षक अभिजीत पाटील, मधुकर तुपसौंदर, हेमा ढेबे, रवींद्र फुलपगारे आदींनी ही कारवाई केली. वारजेतील काच व्यापार्‍याकडे माथाडी संघटनेच्या नावाखाली खंडणी मागणार्‍या अविनाश दिलीप अडागळे (वय 32, रा. वारजे) याला खंडणी विरोधी पथकाने अटक केली. व्यापार्‍याकडे आलेल्या टेम्पोतील काचा उतरविण्यासाठी अडागळेने खंडणीची मागणी केली होती. व्यापार्‍याने तक्रार दिल्यानंतर पोलीस निरीक्षक अजय वाघमारे आणि पथकाने अडागळेला ताब्यात घेतले.

COMMENTS