Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

ना. जयंत पाटील-आनंदराव रमजान ईद निमित्त एकत्र; राजकीय चर्चेला उधाण : तर…शिवसेनेचा नगराध्यक्ष?

इस्लामपूर पालिकेत शिवसेनेचा नगराध्यक्ष?राज्यात जशी महाविकास आघाडी आहे तशी इस्लामपूरात आघाडी केली तर सत्ता स्थापन करण्यास सोपे होईल. राज्यात जो फॉ

घाणबी येथे कोसळला विजेचा खांब; पाटण महावितरण कार्यालयाचा अनागोंदी कारभार
राजे प्रतिष्ठानची लवकरच नवी कार्यकारिणी : खा. श्री. छ. उदयनराजे भोसले
विधान परिषदेवर हाळवणकर-देशपांडे की पाटील?

इस्लामपूर पालिकेत शिवसेनेचा नगराध्यक्ष?
राज्यात जशी महाविकास आघाडी आहे तशी इस्लामपूरात आघाडी केली तर सत्ता स्थापन करण्यास सोपे होईल. राज्यात जो फॉर्म्युला चालू आहे तोच फॉर्म्युला इस्लामपूरात देखील करू, अशा चर्चेने उधाण आले आहे. म्हणजे इस्लामपूरचा नगराध्यक्ष शिवसेनेचा असणार की काय? हा प्रश्‍न शहरवासियांना पडला आहे.

इस्लामपूर / प्रतिनिधी : इस्लामपूरातील विकास आघाडीला शह देण्यासाठी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष ना. जयंत पाटील यांनी कंबर कसली आहे. रमजान ईदच्या निमित्ताने मुस्लिम बांधवांना इदगाह परिसरात शुभेच्छा देण्यासाठी शिवसेना जिल्हा प्रमुख आनंदराव पवार व मंत्री जयंत पाटील हे परस्पर विरोधी बाजूला उभे होते. पवार आणि ना. जयंत पाटील ईदच्या माध्यमातून एकत्र आले. त्यामुळे या ईदच्या शुभेच्छा कार्यक्रमामुळे आगामी पालिका निवडणुकीसाठी राष्ट्रवादी-शिवसेना एकत्र येणार असल्याची चर्चा राजकिय वर्तुळात रंगू लागली आहे.
गत पालिका निवडणुकित शिवसेनेचे आनंदराव पवार यांनी अर्ज माघारी दिवशीच राष्ट्रवादी विरोधात शिवसेनेची एक जागा बिनविरोध निवडुन आणली होती. हा पराभव मंत्री जयंत पाटील यांच्या जिव्हारी लागला होता. पाच वर्षानंतर इस्लामपूर येथील इदगाह परिसरात मुस्लिम समाजातील बांधवांना शुभेच्छा देण्यासाठी एकत्र आले होते. शुभेच्छा देऊन राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि शिवसेना जिल्हाप्रमुख आनंदराव पवार हे राष्ट्रवादीचे युवा नेते अंगराज पाटील यांच्या घरी एकत्र बसले होते. एवढेच नव्हे तर शेजारी शेजारी बसून ’तुझ्या गळा माझ्या गळा’ हे गाणे गुणगुणत होते. या त्यांच्या एकत्रित येण्याच्या चर्चेला इस्लामपूरात चांगलेच उधाण आले आहे.
आगामी नगरपालिका निवडणुकीसाठी बेरजेचे राजकारण करण्याची आनंदराव पवार व ना. जयंत पाटील यांच्यामध्ये चर्चा झाली असल्याची चर्चा शहरात सुरू होती. राज्यात जशी महाविकास आघाडी आहे तशी इस्लामपूरात आघाडी केली तर सत्ता स्थापन करण्यास सोपे होईल. राज्यात जो फॉर्म्युला चालू आहे तोच फॉर्म्युला इस्लामपूरात देखील करू, अशी चर्चा झाली असल्याचे समजते आहे.

COMMENTS