लिंबागणेश : बीड तालुक्यातील लिंबागणेश येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 व्या जयंतीनिमित्त मंगळवारी ग्रामपंचायत कार्यालयात उत्साहपू

लिंबागणेश : बीड तालुक्यातील लिंबागणेश येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 व्या जयंतीनिमित्त मंगळवारी ग्रामपंचायत कार्यालयात उत्साहपूर्ण वातावरणात कार्यक्रम साजरा करण्यात आला. यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून श्रीफळ फोडण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच बालासाहेब जाधव होते. प्रास्ताविक भिम टायगर ग्रुपचे जिल्हाध्यक्ष रविंद्र निर्मळ यांनी केले, तर सूत्रसंचालन आरूण निर्मळ यांनी केले. आभार प्रदर्शन सुरेश निर्मळ यांनी मानले. प्रा. लेनाजी गायकवाड यांनी आपल्या भाषणात डॉ. आंबेडकरांनी स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्यायावर आधारित समाजव्यवस्था उभी करण्यासाठी दिलेला शिका, संघटीत व्हा, संघर्ष करा हा मूलमंत्र आजही मार्गदर्शक असल्याचे प्रतिपादन केले. यावेळी माजी सरपंच बाळासाहेब मुळे, पत्रकार हरिओम क्षीरसागर, ग्रामपंचायत सदस्य रमेश गायकवाड, पोपट निर्मळ यांचीही भाषणे झाली. यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समितीची निवड जाहीर करण्यात आली. अध्यक्षपदी रावसाहेब निर्मळ, उपाध्यक्षपदी सुरज कदम, सचिवपदी तुकाराम गायकवाड, कोषाध्यक्षपदी तुळशीराम पवार यांची निवड करण्यात आली. सल्लागार म्हणून माजी पंचायत समिती सदस्य राजेभाऊ गिरे, डॉ.गणेश ढवळे, साहेबराव निर्मळ,डिगांबर निर्मळ, बाळकृष्ण थोरात, अँड.गणेश वाणी,जितेंद्र निर्मळ, दामोदर थोरात, दादा गायकवाड, सुरेश ढवळे,बापू थोरात, शफीभाऊ यांची नियुक्ती करण्यात आली असून सदस्य म्हणून औदुंबर नाईकवाडे, पप्पू आवसरे, शंकर वाणी, अमोल निर्मळ, रिंकू निर्मळ, सुमेध निर्मळ, स्वप्निल निर्मळ, अमोल वक्ते, बन्सी निर्मळ, संदीप निर्मळ, बालाजी निर्मळ, प्रमोद निर्मळ, प्रकाश निर्मळ, कैलास गायकवाड, श्रीमंत निर्मळ, रोहन आवसरे आदींचा समावेश आहे. कार्यक्रमात लिंबागणेश येथील भूमिकन्या पायल प्रमोद निर्मळ हिची महाराष्ट्र पोलीस दलात निवड झाल्याबद्दल तिचा सहकुटुंब सत्कार करण्यात आला. समाज प्रबोधनात्मक उपक्रमांद्वारे भिमजयंती साजरी करण्यात येणार असल्याची माहिती पदाधिकार्यांनी दिली. तसेच ग्रामपंचायतीच्या वतीने नव्याने निवड झालेल्या पदाधिकार्यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

COMMENTS