Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

प्रा. सोफियाँ मुल्ला यांना पीएचडी पदवी प्रदान

म्हसवड / वार्ताहर : फलटण एज्यकेशन सोसायटी फलटणच्या म्हसवड येथील श्रीमंत भैय्यासाहेब राजेमाने महाविद्यालयाच्या इंग्रजी विषयाच्या अधिव्याख्यात्या क

प्रजासत्ताक दिनादिवशी वारणावती वन्यजीव कार्यालयासमोर तीव्र आंदोलनाचा इशारा
माजी मंत्री पाटणकर यांच्यावर सोशल मीडियावर अवमान; राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या शैक्षणिक प्रवासातील सातारा

म्हसवड / वार्ताहर : फलटण एज्यकेशन सोसायटी फलटणच्या म्हसवड येथील श्रीमंत भैय्यासाहेब राजेमाने महाविद्यालयाच्या इंग्रजी विषयाच्या अधिव्याख्यात्या कु. वहिदा जमादार उर्फ सौ सोफियाँ अहमद मुल्ला यांना शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर या विद्यापीठाने पीएच. डी. पदवी प्रदान केली.
प्रा. सौ. सोफियाँ मुल्ला यांनी विद्यापीठास इंग्रजी विषयात – BIOLINGUISTIC STUDY OF ENGLISH  L ANGUAGE ACQUISTION  AND PRODUCTION शोध प्रबंध सादर केला. हा महाराष्ट्रातील एकमेव नविन व नाविण्यपूर्ण संशोधन असून या पूर्वी त्यांनी यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापिठ नाशिक विद्यापिठातून दि बायोलिग्वीस्टीक स्टडी ऑफ इग्लिश लॅग्वेज अ‍ॅक्विझिशन इन प्रायमरी स्कूल ऑफ माण तालुका हा शोध प्रबंध सादर करुन त्यात सौ. मुल्ला यांनी एम फिल ही पदवी प्राप्त केली आहे. पीएच डी प्रबंध पूर्ण करण्यासाठी त्यांना डॉ. पंजाबराव रोंगे, प्राचार्य आर्ट कॉमर्स कॉलेज माढा, जि. सोलापूर, शिवाजी विद्यापिठ कोल्हापूरच्या इंग्रजी विभागाचे प्रमुख डॉ. टि. के. करेकट्टी, डॉ. ए. एम. सरवदे, डॉ. सी. ए. लंगरे, डॉ. एम. ए. शेख यांनी मोलाचे मार्गदर्शन केले. प्रा. वहिदा गनिम जमादार उर्फ डॉ. सोफियाँ अहमद मुल्ला यांनी मिळवलेल्या या यशाबद्दल फलटण एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष व विधान परिषदेचे सभापती ना. रामराजे नाईक निंबाळकर, चेअरमन
श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, सचिव श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, रमणलाल दोशी, स्कूल कमिटीचे चेअरमन हेमंत रानडे, व्हाईस चेअरमन, अ‍ॅड. श्रीमंत पृथ्वीराज राजेमाने, सदस्य नितीन दोशी, श्रीमंत शिवराज राजेमाने, विपूल दोशी, संभाजी माने, प्रशासन अधिकारी अरविंद निकम, अधिक्षक श्रीकांत फडतरे, प्राचार्य सर्जेराव घोलप, प्राचार्य प्रवीण दासरे, प्राचार्य नारायण नाळे, प्रा. फादर वर्गीस, फादर बॉबीन, फादर जॉमी, फादर फ्रांसिस, नगराध्यक्ष भगतसिंग विरकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर अध्यक्ष युवराज सुर्यवंशी, रासपचे माण खटाव तालुका प्रमुख आप्पासाहेब पुकळे, काँग्रेसचे प्रा. विश्‍वंभर बाबर, गब्बार काझी, माजी नगराध्यक्ष विजय सिन्हा, माजी उपनगराध्यक्ष धनाजीराव माने, कैलास भोरे, माजी प्राचार्य ए. व्ही. घोरपडे, ए. के. रुपनवर, अरुण काकडेसर, एम. जी. नाळे, माण तालुका पत्रकार संघाचे सर्व पत्रकार व पदाधिकार्‍यांनी अभिनंदन केले.

COMMENTS