Homeताज्या बातम्याबीड

शेतकरी ग्राहकांनी बियाणे व खते खरेदी करताना दक्षता घ्यावी-अनिल बोर्डे

खरीप हंगामाला लवकरच सुरुवात होणार आहे. खरीप हंगाम शेतकरी ग्राहकाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा कालावधी असतो. या कालावधीमध्ये शेतकरी ग्राहकाची बि

जळगाव जिल्ह्यातील रावेरा तालुक्यामध्ये मान्सूनपूर्व पाऊस
राडी येथे खेती बचाव अभियानाचा शुभारंभ; शेतकर्‍यांना आधुनिक शेती तंत्रज्ञानाचे मार्गदर्शन
मंत्रालयीन विभागांची पुनर्रचनेस मान्यताप्रशासकीय विभागांची संख्या 33 वरून 45 होणार


खरीप हंगामाला लवकरच सुरुवात होणार आहे. खरीप हंगाम शेतकरी ग्राहकाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा कालावधी असतो. या कालावधीमध्ये शेतकरी ग्राहकाची बियाणे व खते खरेदी करण्याची लगबग सुरू असते यावेळी शेतकरी बियाणे व व खते खरेदी करताना काळजी घेत नाही असे निदर्शनास आले आहे. त्यामुळे त्याला नुकसानीचा सामना करावा लागतो. त्यासाठी शेतकरी ग्राहकाची फसवणूक होणार नाही याची दखल घ्यावी असे आवहान बीड जिल्हा ग्राहक पंचायत महाराष्ट्राचे जिल्हा उपाध्यक्ष तथा गेवराई ग्राहक मार्गदर्शन केंद्रप्रमुख अनिल बोर्डे यांनी या पत्राद्वारे केले आहे.
महाडीबीटी प्रणाली द्वारे नोंदणी प्रक्रिया द्वारे 15 मे 2026 पर्यंत कृषी विभागाकडे अर्ज सादर करणे आवश्यक आहे.  परवानाधारक विक्रेत्याकडून बियाणे व खते खरेदी करणे आवश्यक आहे आणि माती परीक्षण करणे आवश्यक आहे .माती परीक्षणा नुसार आवश्यक तेवढेच  खत अधिकृत केंद्राकडून खरेदी केल्यास पैशाची बचत होते. गोणी वरील बॅच नंबर,( चठझ) बॅच नंबर उत्पादन तारीख तपासा . अतिशय स्वस्त दरात खत व बियाणे देणार्‍या पासून सावध राहा. छापील किमतीपेक्षा जास्त बिल देऊ नका. पक्के बिल नक्की घ्या. खते व बियाणे तक्रार निवारण्यासाठी अधिकृत पावती असणे आवश्यक आहे.  आधार कार्ड शिवाय खत  खरेदी करता येणार नाही. अनुदानित खत खरेदीसाठी आधार लिंक असणे आणि पि ओ एस मशीनवर बायोमेट्रिक पडताळणी करणे बंधनकारक आहे.  जमिनीच्या क्षेत्रानुसार खताचे वाटप केले जाईल. फार्मर आयडीवर जेवढी जमीन लिंक आहे त्याच प्रमाणात खताची विक्री केली जाणार आहे.   वरील बाबीची दक्षता घेऊन खते व बी बियाणे खरेदी करावीत.  तक्रारीसाठी कृषी केंद्राची संपर्क साधावा. खत विक्रीत अनियमितता आढळून आल्यास कृषी विभागाच्या तक्रार निवारण केंद्राशी संपर्क करावा असे आवहान बीड ग्राहक पंचायत महाराष्ट्र जिल्हा उपाध्यक्ष अनिल बोर्डे यांनी या पत्राद्वारे केले आहे.

COMMENTS