Homeताज्या बातम्याबीड

किरण डोळस यांना राज्यस्तरीय पद्मपाणी पुरस्कार जाहीर

साहित्य, समाजसेवा आणि आपल्या उल्लेखनीय कर्तृत्वाच्या जोरावर स्वतःचा वेगळा ठसा उमटवणार्‍या सौ. किरण डोळस यांना यंदाचा मानाचा राज्यस्तरीय पद्मपाणी

बृहन्मुंबई महानगरपालिकेत कार्यकारी सहाय्यकपदी निवडप्रज्ञा जाधव-आठवले यांचा नागसेन बुद्धविहारात सत्कार
आनंदगाव बाल लैंगिक अत्याचार प्रकरण: माजलगाव न्यायालयाकडून आरोपींना अटकपूर्व जामीन मंजूर
मृदा, जल आणि वृक्ष संवर्धन केले तरच भविष्य उज्ज्वल – जलनायक मयंक गांधीसरस्वती नदी पुनरुज्जीवन कामाचा शुभारंभ; हजारोंच्या उपस्थितीत संवाद मेळावा संपन्न



साहित्य, समाजसेवा आणि आपल्या उल्लेखनीय कर्तृत्वाच्या जोरावर स्वतःचा वेगळा ठसा उमटवणार्‍या सौ. किरण डोळस यांना यंदाचा मानाचा राज्यस्तरीय पद्मपाणी पुरस्कार जाहीर झाला आहे. त्यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
पद्मपाणी प्रतिष्ठानच्या वतीने दिला जाणारा हा प्रतिष्ठेचा पुरस्कार सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाची दखल घेऊन प्रदान करण्यात येतो. सामाजिक बांधिलकी जपत अत्यंत चिकाटी, निष्ठा आणि समर्पणभावाने कार्य करणार्‍या सौ. किरण डोळस यांनी आपल्या कार्यातून राज्याच्या पटलावर स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. या पुरस्कारामुळे केवळ डोळस कुटुंबाचाच नव्हे, तर बीड जिल्ह्याच्या शिरपेचातही मानाचा तुरा खोवला गेला आहे. हा पुरस्कार माझ्या कार्याला मिळालेली पावती असून, यामुळे भविष्यात अधिक जोमाने आणि उत्साहाने समाजकार्य करण्याची प्रेरणा मिळाली आहे, अशी भावना सौ. किरण डोळस यांनी व्यक्त केली. किरण ताईंच्या या यशाबद्दल सर्वत्र त्यांचे कौतुक होत असून, आगामी काळात त्यांच्या हातून अशीच समाजसेवा आणि राष्ट्रसेवा घडत राहो, हीच सर्वांची सदिच्छा आहे.

COMMENTS