Homeताज्या बातम्यासंपादकीय

राज्यात पुन्हा राजकीय धुरळा

राज्यात शिवसेनेमध्ये उभी फूट पडल्यानंतर आणि राज्यात सत्तांतर झाल्यानंतर राजकीय धुरळा कमी झाला होता. धुरळा कमी झाल्यामुळे राजकीय वातावरण शांतपणे प

काँगे्रससमोर पक्षफुटीचे आव्हान
विद्युत वाहनांना मंत्र्यांचीच नकारघंटा
भारत न्याय यात्रेला होणारा विरोध

राज्यात शिवसेनेमध्ये उभी फूट पडल्यानंतर आणि राज्यात सत्तांतर झाल्यानंतर राजकीय धुरळा कमी झाला होता. धुरळा कमी झाल्यामुळे राजकीय वातावरण शांतपणे पाहता येत होता, अंदाज बांधता येत होते. मात्र हा धुरळा खाली बसतो न बसतो तोच राष्ट्रवादी काँगे्रसमध्ये उभी फूट पडली. अर्थात राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार त्याला फूट पडत नसून आमच्यातील काही लोकांची वेगळी भूमिका असल्यामुळे ते बाजूला गेल्याचे म्हणत आहेत. अजित पवार गट सत्तेत जावून दोन महिन्यांचा कालावधी उलटला, तरी या दोन महिने शांततेचे गेले असेच म्हणावे लागेल. कारण अजित पवार गटाने मुंबईतील छोटेखानी सभा सोडली तर शरद पवारांवर थेट टीकेची तोफ डागली नव्हती. आणि शरद पवारांनीही बोचरी टीका, थेट हल्ला चढवला नव्हता. मात्र शरद पवारांनी बारामती, पुणे, सातारा आणि कोल्हापूर आणि नाशिक असा दोन दिवसांचा दौरा केला. यामध्ये त्यांनी बारामतीमध्ये अजित पवार आमचेच नेते असल्याचा दावा केला. त्यानंतर पुण्यामध्ये त्यांनी मी असे म्हटलोच नाही म्हणत घूमजाव केले. त्यानंतर कोल्हापुरमध्ये शरद पवारांनी अजित पवार गटाचा चांगलाच समाचार घेतला. खरं म्हणजे असं म्हणतात शरद पवार जे बोलतात ते करत नाही, आणि जे करत नाही ते बोलतात. त्यामुळे शरद पवारांविषयी संभ्रम असला तरी, त्यांनी आपण भाजपसोबत जाणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे शरद पवार आपल्या राजकारणाच्या उत्तरार्ध भाजपमध्ये जाण्याची सुतराम शक्यता नाही. असे असतांना शरद पवार अशी कोणती राजकीय चाल खेळतांना दिसून येत आहे. तर याचा अंदाज अजूनही भल्याभल्यांना आलेला नाही. कारण कुणी शरद पवारांच्या त्या अंदाजाजवळ पोहचले की, पवार त्याविरोधात वक्तव्य करून आपली राजकीय चाल खेळून मोकळी होतात. गेल्या दोन महिन्यांमध्य महाविकास आघाडीच्या नेत्यांनी सुद्धा शरद पवारांवर संशय घेण्यास सुरुवात केली होती. अजित पवार गट बाहेर पडल्यानंतर शरद पवारांनी तडकाफडकी निर्णय घ्यावा म्हणजेच उद्धव ठाकरेंसारखा असे महाविकास आघाडीतील नेत्यांना अभिप्रेत होते. मात्र उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची जी वाताहात झाली ती पवार आपल्या पक्षाची होवू देणार नाही, याचे गणित अजूनही अनेकांना कळले नाही. खरंतर पवारांच्या राजकारणातून अनेक शक्यता व्यक्त करण्यात येतात. त्यापैकी शरद पवार आपल्याच लोकांना वाचवत असल्याचे दिसून येत आहे. अजित पवार गट भाजपसोबत गेल्यामुळे अनेकांना ईडीच्या कारवायांपासून संरक्षण मिळाले, तर दुसरीकडे शरद पवार पुन्हा एकदा जोमाने पक्षाची बांधणी करतांना दिसून येत आहे. यातून राष्ट्रवादीला बळच मिळतांना दिसून येत आहे. कारण कोल्हापूरमध्ये शरद पवारांच्या सभेला जो प्रतिसाद मिळाला त्यातून अनेकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. कारण पवार कधी काय खेळी करतील याचा अंदाज अजूनही भाजपला येतांना दिसून येत नाही. त्यामुळे राज्यात जर निवडणुका झाल्यास तर या निवडणुकांसाठी राष्ट्रवादी आणि उद्धव ठाकरे गट तयार असल्याचे दिसून येत आहे. कारण दोघांसमोरही पक्षाच्या भवितव्यावरच प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले आहे. उद्धव ठाकरेंकडून तर पक्षच गेला आहे, त्यामुळे दोघांकडूनही नव्याने बांधणी करण्यात येत आहे. तर दुसरीकडे भाजपकडून आयात करण्यावर भर आहे. तर काँगे्रसकडून अजूनतरी कोणत्याही प्रकारचे प्रभावी संघटन राबवण्यात येत नाही. त्यामुळे आगामी काळात निवडणुका झाल्यास ज्याची पुरेपूर तयारी तोच परीक्षेत पास होणार आहे, त्यामुळे अनेकांना धडकी भरल्याचे दिसून येत आहे.

COMMENTS