Homeताज्या बातम्या

शेतकऱ्यास मारहाण; कुंभेफळ ग्रामपंचायतीच्या माजी उपसरपंचासह सहा जणांवर गुन्हा दाखल

कर्जत: तालुक्यातील कुंभेफळ येथे शेतात जाऊन शेतकऱ्यास मारहाण, शिवीगाळ व जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी सहाजणांविरुद्ध कर्जत पोलिस ठाण्यात गुन्ह

नांदेडच्या नूतन जिल्हा पोलीस अधीक्षकपदी निलभ रोहन; पदभार स्वीकारला
पाटोदा तालुक्यातील चिंचोली जिल्हा परिषद शाळेची भिंत वर्ष उलटूनही दुरुस्त नाही; विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
सज्जन-दुर्जन असा भेद न करता माऊलींनी सर्वांवर कृपा केली; ह.भ.प. श्री राम महाराज काजळे यांचे प्रतिपादन
Jalgaon News : पाच हल्लेखोरांनी शेतकऱ्याला मारहाण करून लुटले

कर्जत: तालुक्यातील कुंभेफळ येथे शेतात जाऊन शेतकऱ्यास मारहाण, शिवीगाळ व जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी सहाजणांविरुद्ध कर्जत पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी चारपाटीनाथ उर्फ पप्पू धोदाड हे कुंभेफळ ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच असून भारतीय जनता पक्षाचे कर्जत तालुका सरचिटणीस आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी संदीप शिवदास पाटील (वय ४३, रा. कुंभेफळ) यांचा आरोपींसोबत जमिनीच्या तसेच कौटुंबिक कारणावरून जुना वाद सुरू आहे. शनिवारी (दि. २७ जून) सकाळी पाटील हे आपल्या अल्पवयीन मुलीसह गट क्रमांक १७६ मधील शेतात काम करत असताना सर्व आरोपी अचानक तेथे आले.

फिर्यादीनुसार, आरोपी चारपाटीनाथ धोदाड यांनी हातातील तलवारीने थेट वार करण्याचा प्रयत्न केला आणि “ही जमीन मी खरेदी केली आहे, तू मला नोटीस कशी पाठवतो?” असे म्हणत जीवे मारण्याची धमकी दिली. पाटील यांनी वार चुकवल्यानंतर आरोपी भाऊसाहेब धोदाड व धीरज धोदाड यांनी त्यांना काठ्यांनी बेदम मारहाण केली. तसेच गळ्यातील सोन्याची साखळी बळजबरीने हिसकावून घेतल्याचा आरोपही फिर्यादीने केला आहे. या वेळी झालेल्या आरडाओरड्यामुळे आसपासचे नागरिक तातडीने घटनास्थळी धावून आल्याने फिर्यादी व त्यांच्या मुलीची सुटका झाली.

या प्रकरणी कर्जत पोलिसांनी चारपाटीनाथ उर्फ पप्पू धोदाड, भाऊसाहेब धोदाड, सुरज धोदाड, धीरज धोदाड, वैशाली धोदाड आणि अश्विनी धोदाड यांच्याविरुद्ध विविध कलमांखाली गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू केला आहे.

COMMENTS