अहिल्यानगर : शहरातील मोरचूदनगर परिसरात चोरट्याने घरफोडी करून सुमारे तीन लाख रुपयांचा सोन्या-चांदीचा ऐवज चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्र

अहिल्यानगर : शहरातील मोरचूदनगर परिसरात चोरट्याने घरफोडी करून सुमारे तीन लाख रुपयांचा सोन्या-चांदीचा ऐवज चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत कल्याणी मंगेश टिक्कल (रा. गायके मळा, मोरचूदनगर, अहिल्यानगर) यांनी फिर्याद दिली आहे.
चोरट्याने घराच्या मुख्य दरवाजाचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला. त्यानंतर कपाटातील लॉकरमधून सुमारे ५० ग्रॅम वजनाचे विविध प्रकारचे सोन्याचे दागिने आणि सुमारे ५०० ग्रॅम वजनाच्या चांदीच्या वस्तू चोरून नेल्या. चोरीस गेलेल्या ऐवजाची एकूण किंमत सुमारे तीन लाख रुपये असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
याप्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला, पोलीस उपनिरीक्षक समाधान सोळंखे पुढील तपास करत आहेत.

COMMENTS