अहिल्यानगर : देहरे गावात चोरट्याने घरफोडी करून सोन्याचे दागिने, चांदीचे दागिने, भ्रमणध्वनी आणि रोख रक्कम असा एकूण ७८ हजार ५०० रुपयांचा ऐवज चोरून
अहिल्यानगर : देहरे गावात चोरट्याने घरफोडी करून सोन्याचे दागिने, चांदीचे दागिने, भ्रमणध्वनी आणि रोख रक्कम असा एकूण ७८ हजार ५०० रुपयांचा ऐवज चोरून नेल्याची घटना घडली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत संभाजी बाबू जाधव (रा. देहरे, ता. जि. अहिल्यानगर) यांनी फिर्याद दिली आहे. २ ऑगस्ट रोजी ही चोरी झाली. चोरट्याने घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. त्यानंतर घरातील सोन्याचे दागिने, चांदीचे दागिने, रोख रक्कम, भ्रमणध्वनी तसेच अशोक नंदकिशोर जाधव यांचेही दागिने व रोख रक्कम चोरून नेली. चोरीस गेलेल्या ऐवजात सोन्याचे दागिने, चांदीच्या चाळ्या, भ्रमणध्वनी आणि एकूण ३५ हजार रुपये रोख रकमेचा समावेश आहे.

COMMENTS