Homeताज्या बातम्या

ठाकरेंनी काँग्रेसचे पाय धरल्याने शिवसैनिकांचा विश्वास ढासळला; खासदार डॉ. श्रीकांत शिंदेंची जोरदार टीका

सोनई: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी शनिशिंगणापूर येथे शनिदर्शनानंतर माध्यमांशी संवाद

शेतकरी कर्जमुक्तीसह कायमस्वरूपी उपाययोजनांवर भर द्यावा: आ. विवेक कोल्हे; अभ्यासपूर्ण मांडणीने गाजवले अधिवेशन
खासदार संजय दिना पाटलांची पत्रकारांना कॅमेऱ्यासमोर शिवीगाळ; सत्तेत जाताच वाढली मुजोरी, राज्यभरातून तीव्र संताप
शोल्डर- मलबार हिल शाखा अंतर्गत पश्‍चिम उपविभागातमेन – शासकीय बंगल्यांच्या कामांमध्ये कोट्यावधींचा घोटाळा; सार्वजनिक बांधकाम विभागातील शासकीय निधीची लूट; अधिकार्‍यांची संगनमताने मिलीभगत : डॉ. अशोक सोनवणे
Shrikant Shinde : 'एनडीए'कडून श्रीकांत शिंदेंची 'या' पदासाठी नियुक्ती,  बैठकीत महत्त्वाचा निर्णय | Navarashtra

सोनई: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी शनिशिंगणापूर येथे शनिदर्शनानंतर माध्यमांशी संवाद साधताना उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली. “२०१९ मध्ये हिंदुत्वाच्या विचारांशी प्रतारणा करून उद्धव ठाकरे यांनी काँग्रेसचे पाय धरले. त्यामुळे शिवसैनिकांचा विश्वास उडाला असून हजारो कार्यकर्ते एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत प्रवेश करत आहेत,” असा दावा त्यांनी केला.

शनिवारी सायंकाळी सुमारे पाचच्या सुमारास खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, खासदार ओमराजे निंबाळकर आणि मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांनी शनिशिंगणापूर येथे श्री शनिदेवाचे दर्शन घेतले. यावेळी नेवासा तालुक्याच्या वतीने आ. विठ्ठलराव लंघे यांनी त्यांचे स्वागत केले. महायुतीतील भाजप व शिवसेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्व मान्यवरांनी शनि चौथऱ्यावर जाऊन शनीमूर्तीवर विधीवत तेलाभिषेक केला. पुरोहित अशोकदेव कुलकर्णी यांनी हे पूजन करून घेतले.

यानंतर देवस्थानच्या जनसंपर्क कार्यालयात माध्यमांशी संवाद साधताना “शनिदर्शनावेळी काय मागितले?” या प्रश्नावर खासदार शिंदे म्हणाले, “वेळ मिळेल तेव्हा मी शनिदर्शनासाठी येत असतो. सर्वसामान्य जनतेचे कल्याण व्हावे, हीच देवाचरणी प्रार्थना केली.”

तर ‘ऑपरेशन टायगर’ संदर्भात विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. “शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी कायम हिंदुत्वाची भूमिका घेतली. कलम ३७० हटविणे आणि अयोध्येत राम मंदिर उभारण्याला त्यांनी पाठिंबा दिला होता. महायुती सरकारने ही आश्वासने पूर्ण केली. त्यामुळे सरकारबद्दल जनतेचा विश्वास वाढला आहे. मात्र २०१९ मध्ये उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्वाची विचारधारा सोडून काँग्रेससोबत सत्ता स्थापन केली. त्यामुळे शिवसैनिकांनी त्यांच्यावरील विश्वास गमावला,” असे ते म्हणाले.

या दर्शनानंतर नेवासा तालुक्याच्या वतीने तिन्ही खासदारांचा विशेष सत्कार करण्यात आला. या प्रसंगी माजी आमदार भाऊसाहेब कांबळे, शिवसेना जिल्हाप्रमुख बाबुशेठ टायरवाले, बाळासाहेब पवार, प्रभाकर शिंदे, तिरुपती देवस्थानचे विश्वस्त सौरभ बोरा, सचिन देसरडा, देवस्थानचे कार्यकारी अधिकारी अतुल चोरमारे, जनसंपर्क अधिकारी अनिल दरंदले आदींसह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.

COMMENTS