Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अंबाजोगाई आरटीओ कार्यालयात वाहन एक पगार निघतो दोन चालकांचा

अंबाजोगाई प्रतिनिधी - अंबाजोगाई येथील उप प्रादेशिक परिवहन कार्यालयातील भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला आहे हे कार्यालयास एक वाहन असून या वाहनावर शा

पेन्शन मंजूर, पण ना-हरकत दाखल्यासाठी हेलपाट्यांची वेळ ; रयतच्या निवृत्त मुख्याध्यापकाचे उपोषण
गोरक्षनाथ टेकडी  येथे गुरुवार रोजी हभप.जगन्नाथ महाराज सांगळे यांचे कीर्तन
अक्षता पडल्या आणि वधूचा पाराच चढला… लग्नच मोडलं I LOKNews24

अंबाजोगाई प्रतिनिधी – अंबाजोगाई येथील उप प्रादेशिक परिवहन कार्यालयातील भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला आहे हे कार्यालयास एक वाहन असून या वाहनावर शासकीय व कंत्राटी असे दोन वाहन चालक कार्यरत आहेत. एक वाहन व दोन चालकांमुळे शासनाच्या आर्थिक तिजोरी वर ताण पडू लागला आहे शासनाची होणारी फसवणूक त्वरित थांबवण्याची त्यामुळे मागणी होत आहे.
 येथील व प्रादेशिक परिवहन कार्यालय रस्ता सुरक्षा सप्ताह मध्ये रस्त्यावरील अपघात कमी करण्यासाठी सुरक्षेच्या दृष्टीने उपाय योजना राबवल्या नाहीत मागील काही दिवसांपूर्वी सुरक्षा सप्ताह सुरू असतानाच रस्त्यावरील अपघातात दोन बळी गेले त्यामुळे कार्यालयाचा निष्क्रियपणासमोर आला आहे त्यातच कार्यालयाचा निष्क्रियपणा समोर आला असून शासनाची फसवणूक कशी केली जाते हे उघडकीस आले आहे. कार्यालयात पूर्वी दोन शासकीय वाहने होती मात्र आता एकच वाहन असताना दोघांचे वेतन काढले जात असल्याने ही शासनाची फसवणूक केली जातेय.प्रामुख्याने ही वाहने चालवण्यासाठी एक शासकीय व कंत्राटी असे दोन चालक होते. परंतु काही दिवसापूर्वी जुने वाहन बंद केले आहे. वाहन बंद करूनही अनेक वर्ष झाले तरी कार्यरत असलेल्या गाडीवर शासकीय व कंत्राटी वाहन चालक काम करतात असे दाखवून दोघांचेही वेतन काढले जाते.मुळात कार्यालयात शासकीय वाहन चालक असताना कंत्राटी चालकाची आवश्यकता नसताना तो कंत्राटी चालक कार्यरत आहे. तो कोणाच्या मर्जीने व कशामुळे त्याला चालक म्हणून गाडी नसताना ठेवले जाते असा प्रश्न उपस्थित होत आहे. दोन चालकांमुळे शासनाच्या तिजोरीवर ताण पडत आहे यामुळे कंत्राटी चालक त्वरित बंद करावा अशी मागणी जनतेतून केली जात आहे.दरम्यान हा चालकाचा चेकिंग ला वसुली साठी वापर केला जात असल्याच्या चर्चा होत आहेत.

COMMENTS