Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

परीक्षेदरम्यान विद्यार्थ्यांना बाहेर काढल्याचा आरोप; आदित्य फार्मसी कॉलेजविरोधात विद्यार्थ्यांमध्ये संताप

बीड : बीड शहरातील खंडेश्वरी रोड परिसरातील आदित्य फार्मसी कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांवर अन्याय झाल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे. परीक्षा सुरू असताना

माजलगावात विकासाच्या नावाखाली उघड ‘डाका’;सुवर्ण जयंती योजना की भ्रष्टाचाराचा बाजार? : नवीदोद्दीन सिद्दिकी
अजितदादांच्या अपघाताआधी बारामतीत अघोरी पूजा; माजी आमदार अमोल मिटकरींचा पुन्हा खळबळजनक दावा
अशोक खरातांचा विश्‍वासू जितेंद्र शेळके यांचा अपघाती मृत्यू

बीड : बीड शहरातील खंडेश्वरी रोड परिसरातील आदित्य फार्मसी कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांवर अन्याय झाल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे. परीक्षा सुरू असताना गणवेश न घातल्याच्या कारणावरून काही विद्यार्थ्यांना थेट परीक्षा हॉलमधून बाहेर काढण्यात आल्याची तक्रार करण्यात आली आहे. या घटनेमुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाल्याची तसेच मानसिक तणाव वाढल्याची चर्चा आहे.
माहितीनुसार, कॉलेज प्रशासनाने गणवेश अनिवार्य असल्याचे सांगत नियमांचे उल्लंघन करणार्‍या विद्यार्थ्यांना परीक्षेला बसण्यास मनाई केली. मात्र, हा निर्णय परीक्षा सुरू असतानाच घेतल्याने विद्यार्थ्यांमध्ये भीती व संतापाचे वातावरण निर्माण झाले. या प्रकरणात विद्यार्थ्यांकडून जबरदस्तीने लेखी निवेदन घेण्याचा प्रयत्न झाल्याचाही आरोप आहे. तक्रारदाराने प्राचार्यांशी दूरध्वनीवर संपर्क साधला असता, शिस्त राखण्यासाठी कारवाई केली असे स्पष्टीकरण देण्यात आल्याचे सांगितले जाते. संबंधित संभाषणाचे कॉल रेकॉर्ड उपलब्ध असल्याचाही दावा करण्यात आला आहे. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हक्कांचा भंग झाल्याचा आरोप करत संबंधित प्राचार्य व कर्मचार्‍यांवर तात्काळ कारवाईची मागणी होत आहे. तसेच, यापूर्वीही संस्थेविरोधात गैरवर्तनाच्या तक्रारी आल्याचे सांगत सखोल चौकशीची मागणी पुढे येत आहे. दरम्यान, या प्रकरणात त्वरित कारवाई न झाल्यास 18 मे 2026 रोजी दलित पँथर संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय किंवा संबंधित कॉलेजसमोर आत्मदाह आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे. आंदोलनादरम्यान कोणतीही अनुचित घटना घडल्यास त्याची जबाबदारी प्रशासनाची राहील, असा इशाराही देण्यात आला आहे. या घटनेमुळे बीड जिल्ह्यातील शैक्षणिक संस्थांच्या कारभारावर पुन्हा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून, प्रशासनाची पुढील भूमिका काय असेल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

COMMENTS