Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

न्यू इंग्लिश स्कूलमध्ये ड्रोन कार्यशाळेचास उत्स्फूर्त प्रतिसाद

देवळाली प्रवरा : राहुरी फॅक्टरी येथील न्यू इंग्लिश स्कूल व गायत्री ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स येथे ‘ड्रोन तंत्रज्ञान आणि त्याचे भविष्य’ या विषयावर आयोजित विशेष कार्यशाळेला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. प्रात्यक्षिकादरम्यान ड्रोनने आकाशात झेप घेताच विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण झाली.  रिमोट कंट्रोलच्या सहाय्याने हवेत स्थिर राहणारा, अचूक हालचाली करणारा व थेट छायाचित्रण करणारा ड्रोन विद्यार्थ्यांसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला. प्रात्यक्षिकादरम्यान ड्रोनद्वारे करण्यात आलेल्या पाण्याच्या फवारणीमुळे विद्यार्थ्यांनी आनंदाने टाळ्यांचा कडकडाट करत जल्लोष केला.  या कार्यशाळेत विद्यार्थ्यांना ड्रोनचा वापर शेतीतील औषध फवारणी, आपत्ती व्यवस्थापन, सुरक्षा व संरक्षण क्षेत्रात कशाप्रकारे केला जातो, याची माहिती सोप्या भाषेत देण्यात आली. तसेच फोलिअर स्प्रे, फर्टिगेशन व सर्व्हेलन्स यांसारख्या आधुनिक उपयोगांचे प्रात्यक्षिक सादर करण्यात आले. ड्रोनचा वापर केवळ छायाचित्रणापुरता मर्यादित नसून विविध क्षेत्रात त्याचे महत्त्व वाढत असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले.  “टीव्हीवर पाहिलेला ड्रोन आज प्रत्यक्ष अनुभवता आला,” अशी प्रतिक्रिया विद्यार्थ्यांनी व्यक्त केली. विद्यार्थ्यांमध्ये विज्ञान व तंत्रज्ञानाविषयी आकर्षण निर्माण करून त्यांना भविष्यासाठी सक्षम बनविणे हा या उपक्रमाचा उद्देश असल्याचे विज्ञान शिक्षकांनी सांगितले.  १९९२ साली डॉ. गीता राऊत यांनी स्थापन केलेली ही संस्था शैक्षणिक गुणवत्तेसाठी ओळखली जाते. पायाभूत शिक्षणावर भर देत शाळेने सातत्याने शंभर टक्के निकालाची परंपरा जपली असून येथील विद्यार्थी विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करत आहेत.या कार्यक्रमास अध्यक्षा डॉ. गीता राऊत, सचिव प्रा. सतीष राऊत, शिक्षकवर्ग तसेच मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते. 

गोसेवा हीच खरी समाजसेवा : देवधर
वाळणाऱ्या झाडांना ग्रामस्थांकडून ‘जीवदान’ग्रामपंचायत व सामाजिक संस्थांचा पुढाकार; सार्वजनिक बांधकामविरुद्ध संताप
विद्यार्थ्यांनी अभ्यासाद्वारे पालकांचे स्वप्न पूर्ण करावे : आव्हाड

देवळाली प्रवरा : राहुरी फॅक्टरी येथील न्यू इंग्लिश स्कूल व गायत्री ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स येथे ‘ड्रोन तंत्रज्ञान आणि त्याचे भविष्य’ या विषयावर आयोजित विशेष कार्यशाळेला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. प्रात्यक्षिकादरम्यान ड्रोनने आकाशात झेप घेताच विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण झाली.

 रिमोट कंट्रोलच्या सहाय्याने हवेत स्थिर राहणारा, अचूक हालचाली करणारा व थेट छायाचित्रण करणारा ड्रोन विद्यार्थ्यांसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला. प्रात्यक्षिकादरम्यान ड्रोनद्वारे करण्यात आलेल्या पाण्याच्या फवारणीमुळे विद्यार्थ्यांनी आनंदाने टाळ्यांचा कडकडाट करत जल्लोष केला.

 या कार्यशाळेत विद्यार्थ्यांना ड्रोनचा वापर शेतीतील औषध फवारणी, आपत्ती व्यवस्थापन, सुरक्षा व संरक्षण क्षेत्रात कशाप्रकारे केला जातो, याची माहिती सोप्या भाषेत देण्यात आली. तसेच फोलिअर स्प्रे, फर्टिगेशन व सर्व्हेलन्स यांसारख्या आधुनिक उपयोगांचे प्रात्यक्षिक सादर करण्यात आले. ड्रोनचा वापर केवळ छायाचित्रणापुरता मर्यादित नसून विविध क्षेत्रात त्याचे महत्त्व वाढत असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले.

 “टीव्हीवर पाहिलेला ड्रोन आज प्रत्यक्ष अनुभवता आला,” अशी प्रतिक्रिया विद्यार्थ्यांनी व्यक्त केली. विद्यार्थ्यांमध्ये विज्ञान व तंत्रज्ञानाविषयी आकर्षण निर्माण करून त्यांना भविष्यासाठी सक्षम बनविणे हा या उपक्रमाचा उद्देश असल्याचे विज्ञान शिक्षकांनी सांगितले.

 १९९२ साली डॉ. गीता राऊत यांनी स्थापन केलेली ही संस्था शैक्षणिक गुणवत्तेसाठी ओळखली जाते. पायाभूत शिक्षणावर भर देत शाळेने सातत्याने शंभर टक्के निकालाची परंपरा जपली असून येथील विद्यार्थी विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करत आहेत.या कार्यक्रमास अध्यक्षा डॉ. गीता राऊत, सचिव प्रा. सतीष राऊत, शिक्षकवर्ग तसेच मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते. 

COMMENTS