Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

रिल्सच्या नादात समृद्धीवर भीषण अपघात; चिमुकल्याचा मृत्यू, 25 जखमी!

https://www.youtube.com/watch?v=Xz2rnlSSJ6c बुलढाणा जिल्ह्यातून अपघाताची एक मोठी बातमी समोर आली आहे. बस चालक आणि वाहकाकडून मोबाईलवर रील बनवण

अवजड वाहनाच्या धडकेने ट्रान्सफॉर्मर जळून खाक; राहुरीत तीन दिवस अंधार; गुन्हा नोंद न झाल्याने महावितरणच्या कारभारावर प्रश्नचिन्ह
निर्माते आर. बी. चौधरी काळाच्या पडद्याआड; उदयपूरमध्ये कारचा भीषण अपघातात मृत्यू
श्रीगोंद्यात जखमी हरिणाचा मदतीअभावी मृत्यू; नागरिकांचा वन विभागावर संताप

बुलढाणा जिल्ह्यातून अपघाताची एक मोठी बातमी समोर आली आहे. बस चालक आणि वाहकाकडून मोबाईलवर रील बनवण्याच्या नादात समृद्धी महामार्गावर (एक खाजगी प्रवासी बसचा अपघात झाला आहे. या भीषण अपघातात दीड वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे तर 25 प्रवासी जखमी झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईहून – पुसदकडे जाणारी एक खाजगी प्रवासी बस समृद्धी महामार्गावर सकाळी सहाच्या सुमारास अपघातग्रस्त झाली. चालक आणि वाहक हे मोबाईलवर रील बनवण्याच्या नादात हा अपघात घडल्याचं खाजगी बस मधील प्रवाशांकडून सांगण्यात येत आहे. मेहकर टोल नाक्याजवळ हा अपघात झाल्याने जखमींना तात्काळ मेहकर येथील ग्रामीण रुग्णालयात हलवण्यात आलं. मात्र त्या ठिकाणी एक तास डॉक्टर उपचारासाठी न आल्याने जखमींच्या नातेवाईकांनी आक्रोश केला. या अपघातात एका दीड वर्ष चिमुकल्याचा मृत्यू झाला असून 25 प्रवासी जखमी झाले आहे. ज्यात सहा प्रवासी गंभीर जखमी असून त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत.
सध्या जखमींवर रुग्णालयात उपचार सुरु असून जखमींमध्ये सहा प्रवासी गंभीर असल्याची माहिती आहे. दरम्यान, अपघातग्रस्त खाजगी बस दुसऱ्या एका कारवर आदळल्याने कारचं ही मोठं नुकसान झालं आहे. तर दुसरीकडे जखमींवर उपचार करण्यासाठी मेहकर ग्रामीण रुग्णालयात एक तास डॉक्टर हजर नसल्याने नातेवाईकांचा देखील आक्रोश बघायला मिळालाय.

COMMENTS