कोपरगाव : येथील के. जे. सोमैया वरिष्ठ व के. बी. रोहमारे कनिष्ठ महाविद्यालयाचा वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ उत्साहात पार पडला. साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांच्या हस्ते विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष अशोकराव रोहमारे होते. यावेळी बोलताना गाडीलकर म्हणाले, के. जे. सोमैया महाविद्यालय हे परिसरातील दर्जेदार शिक्षण देणारे महाविद्यालय असून येथे उच्चविद्याविभूषित प्राध्यापकांमुळे विद्यार्थ्यांना उत्कृष्ट मार्गदर्शन मिळत आहे. विद्यार्थ्यांचे नैपुण्य व कर्तृत्व हे संस्थेच्या नावलौकिकात भर घालणारे असल्याचे त्यांनी नमूद केले. अध्यक्षीय भाषणात अशोकराव रोहमारे यांनी यशस्वी विद्यार्थी व प्राध्यापकांचे अभिनंदन करत संस्थेचा नावलौकिक अधिक वाढावा, अशी अपेक्षा व्यक्त केली. प्राचार्य डॉ. विजय ठाणगे यांनी प्रास्ताविकात गुणवत्तापूर्ण शिक्षण, विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास, रोजगाराभिमुख शिक्षण व पर्यावरण संवर्धनासाठी संस्था कटिबद्ध असल्याचे सांगितले. यावेळी शैक्षणिक, क्रीडा, सांस्कृतिक व वाङ्मयीन क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या २०० विद्यार्थ्यांचा स्मृतिचिन्ह, प्रशस्तीपत्र व पुष्प देऊन सत्कार करण्यात आला. प्राचार्य डॉ. विजय ठाणगे, डॉ. नवनाथ दळवी, डॉ. संतोष पगारे, डॉ. निलेश पोटे, डॉ. गणेश चव्हाण, डॉ. वसुदेव

कोपरगाव : येथील के. जे. सोमैया वरिष्ठ व के. बी. रोहमारे कनिष्ठ महाविद्यालयाचा वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ उत्साहात पार पडला. साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांच्या हस्ते विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष अशोकराव रोहमारे होते.
यावेळी बोलताना गाडीलकर म्हणाले, के. जे. सोमैया महाविद्यालय हे परिसरातील दर्जेदार शिक्षण देणारे महाविद्यालय असून येथे उच्चविद्याविभूषित प्राध्यापकांमुळे विद्यार्थ्यांना उत्कृष्ट मार्गदर्शन मिळत आहे. विद्यार्थ्यांचे नैपुण्य व कर्तृत्व हे संस्थेच्या नावलौकिकात भर घालणारे असल्याचे त्यांनी नमूद केले.
अध्यक्षीय भाषणात अशोकराव रोहमारे यांनी यशस्वी विद्यार्थी व प्राध्यापकांचे अभिनंदन करत संस्थेचा नावलौकिक अधिक वाढावा, अशी अपेक्षा व्यक्त केली. प्राचार्य डॉ. विजय ठाणगे यांनी प्रास्ताविकात गुणवत्तापूर्ण शिक्षण, विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास, रोजगाराभिमुख शिक्षण व पर्यावरण संवर्धनासाठी संस्था कटिबद्ध असल्याचे सांगितले.
यावेळी शैक्षणिक, क्रीडा, सांस्कृतिक व वाङ्मयीन क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या २०० विद्यार्थ्यांचा स्मृतिचिन्ह, प्रशस्तीपत्र व पुष्प देऊन सत्कार करण्यात आला.
प्राचार्य डॉ. विजय ठाणगे, डॉ. नवनाथ दळवी, डॉ. संतोष पगारे, डॉ. निलेश पोटे, डॉ. गणेश चव्हाण, डॉ. वसुदेव

COMMENTS