लोणी : पायरेन्सच्या कृषी विज्ञान केंद्र, बाभळेश्वर येथे मंगळवार (दि. ५ मे) पासून दोन दिवसांच्या कालावधीचे ‘आधुनिक शेळीपालन’ या विषयावर ग्रामीण य
लोणी : पायरेन्सच्या कृषी विज्ञान केंद्र, बाभळेश्वर येथे मंगळवार (दि. ५ मे) पासून दोन दिवसांच्या कालावधीचे ‘आधुनिक शेळीपालन’ या विषयावर ग्रामीण युवक-युवतींसाठी व्यावसायिक प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती केंद्राचे प्रमुख शास्त्रज्ञ शैलेश देशमुख यांनी दिली.
ग्रामीण भागातील युवक-युवतींना कृषी पूरक व्यवसायाच्या माध्यमातून स्वावलंबी बनविण्याच्या उद्देशाने हे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे. संस्थेचे अध्यक्ष तथा जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शालिनी विखे, संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुप्रिया ढोकणे, कृषी विज्ञान केंद्राचे संचालक डॉ. उत्तमराव कदम आणि पायरेन्सचे सचिव डॉ. निलेश बनकर यांच्या मार्गदर्शनाखाली ‘कृषी उद्योजकता अभियान’ अंतर्गत हा उपक्रम राबविण्यात येत आहे.
या प्रशिक्षणामध्ये शेळ्यांच्या विविध जाती, चारा व्यवस्थापन, संगोपन, रोग व आजार नियंत्रण, लसीकरण, प्रकल्प आराखडा तयार करणे, मार्केटिंग, शेड उभारणी तसेच बँकिंग व विविध शासकीय योजनांची सविस्तर माहिती दिली जाणार आहे. याशिवाय प्रत्यक्ष प्रक्षेत्र भेटीद्वारेही मार्गदर्शन करण्यात येणार आहे. इच्छुक व गरजू युवक-युवतींनी प्रवेशासाठी कृषी विज्ञान केंद्राशी तात्काळ संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

COMMENTS