Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

बीडमध्ये 31 मे रोजी 51 मुस्लिम सामूहिक विवाह; रहेबर फाऊंडेशनची घोषणा

रहेबर फाऊंडेशनच्या वतीने 31 मे 2026 रोजी बीड येथे 51 मुस्लिम जोडप्यांचा सामूहिक इस्तेमई विवाह सोहळा आयोजित करण्यात आला आहे. या उपक्रमासाठी आयोजन

सोलापूर-गोवा , हैदराबाद विमानसेवा राहणार बंद
बीडमध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी मान्यता द्यावी – निवेदनाद्वारे मागणी
राहुरी-शनीशिंगणापूर रेल्वेसाठी जमीन मोजणीला विरोध सोनईमध्ये शेकडो शेतकरी एकवटले; भूमीअभिलेख पथक हतबल


रहेबर फाऊंडेशनच्या वतीने 31 मे 2026 रोजी बीड येथे 51 मुस्लिम जोडप्यांचा सामूहिक इस्तेमई विवाह सोहळा आयोजित करण्यात आला आहे. या उपक्रमासाठी आयोजन समितीची निवड करण्यात आली असून अध्यक्षपदी शेख नासिर, उपाध्यक्षपदी शेख राजू आणि सचिवपदी सय्यद अब्दुल करीम (करीम लाला) यांची एकमताने निवड करण्यात आली.
दिनांक 20 मे 2026 रोजी महाराष्ट्र बांधकाम कामगार संघटनेची जिल्हा वार्षिक बैठक राज्याध्यक्ष तथा नगरसेवक अमर शेख आणि बीड काँग्रेस अध्यक्ष परवेझ कुरेशी यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली. यावेळी रहेबर फाऊंडेशनची स्थापना करून सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्याचा निर्णय घेण्यात आला. हा विवाह सोहळा 31 मे रोजी सायंकाळी 5 वाजता तेलगाव रोडवरील किंग पॅलेस येथे संपन्न होणार आहे. या सोहळ्यात सहभागी होणार्‍या 51 नवदांपत्यांना संघटनेच्या वतीने संसारोपयोगी साहित्य देण्यात येणार आहे. दरम्यान, इच्छुक जोडप्यांसाठी 25 एप्रिल 2026 ते 20 मे 2026 या कालावधीत नोंदणी (बुकिंग) सुरू राहणार असल्याचे आवाहन रहेबर फाऊंडेशन समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

COMMENTS