Homeताज्या बातम्यामनोरंजन

बिग बॉस फेम अब्दू रोझिक ला ईडीचं समन्स

मुंबई प्रतिनिधी - ताजिकिस्तानचा प्रसिद्ध गायक आणि अभिनेता अब्दू रोझिक हे जगभरात प्रसिद्ध नाव आहे. अभिनेता सलमान खानच्या बिग बॉस 16 मधून त्याला

रक्षाबंधनपूर्वी बहिणीची भावाला अनोखी भेट, यकृत दान करत वाचवला जीव
आयसीसीकडून विश्‍वचषकाचा सर्वोत्कृष्ट संघ जाहीर
धनगर आरक्षण उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावली

मुंबई प्रतिनिधी – ताजिकिस्तानचा प्रसिद्ध गायक आणि अभिनेता अब्दू रोझिक हे जगभरात प्रसिद्ध नाव आहे. अभिनेता सलमान खानच्या बिग बॉस 16 मधून त्याला प्रचंड प्रसिद्धी मिळाली. त्या सीझनचा सर्वात लोकप्रिय स्पर्धक असलेला अब्दू चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवतो. पण आता हाच अब्दू  संकटात सापडला आहे. मनी लाँड्रिंग प्रकरणात त्याचे नाव समोर आल्यानंतर ईडीने त्याला 14 फेब्रुवारी रोजी चौकशीसाठी बोलावले होते. आता आज अब्दूची पुन्हा चौकशी होणार आहे. आज दुपारी अब्दू हा मुंबईतील ED च्या ऑफीसमध्ये चौकशीसाठी दाखल होणार आहे. मनी लाँड्रिंग प्रकरणात त्याची चौकशी करण्यात येणारा आहे. मात्र त्याच्या वकिलांच्या सांगण्यानुसार, अब्दूला मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात साक्षीदार म्हणून बोलावले आहे.खरं तर, अब्दू हा गायक आणि अभिनेता तर आहेच, पण त्यासोबतच तो तो बिझनेसमनही आहे. अब्दूचे अनेक देशांमध्ये आलिशान रेस्टॉरंट आहेत. बिग बॉस 16 मधून बाहेर आल्यानंतर अब्दूने मुंबईत ‘बुर्गीर’ नावाचे आलिशान रेस्टॉरंटही उघडले. रिपोर्ट्सनुसार, त्याच्या रेस्टॉरंटमध्ये आणखी काही कंपनीचे पैसे गुंतवले गेले आहेत. ही कंपनी ड्रग्जचा व्यवहार करते, अशी चर्चा आहे. याच प्रकरणी ईडीने अब्दूला समन्स पाठवले असून त्याची चौकशी सुरू आहे.

COMMENTS