Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

यंदा चांगल्या पाऊसासोबत अन्नधान्यही मुबलक पिकणार

चांदेकसारे बाल भैरवनाथ आणि माता जोगेश्‍वरी मातेचा कौल

कोपरगाव तालुका ः कोपरगाव तालुक्यातील जागृत देवस्थान म्हणून ओळख असलेल्या बाल भैरवनाथ व माता जोगेश्‍वरी मातेने  यावर्षी महाराष्ट्रात खूप चांगल्या प

अधिकाऱ्यांच्या जाचाला कंटाळुन डॉक्टरने केली आत्महत्या
कोरोनाच्या दुसर्‍या लाटेत दहा पोलिसांचा झाला मृत्यू
“मी आठ दिवसात परत नगरला येणार, क्रीडापटूंचे प्रश्न मी मार्गी लावून देतो – ना. सुनील केदार

कोपरगाव तालुका ः कोपरगाव तालुक्यातील जागृत देवस्थान म्हणून ओळख असलेल्या बाल भैरवनाथ व माता जोगेश्‍वरी मातेने  यावर्षी महाराष्ट्रात खूप चांगल्या प्रकारे पाऊस कडून अन्नधान्य मुबलक पिकले जाईल तसेच चालू वर्षात अनेकांच्या इच्छा आकांक्षा पूर्ण होतील असा कौल कोईक दिला आहे.
तब्बल बाराशे वर्षांपूर्वीची परंपरा आजही चांदेकसारे ग्रामस्थांनी सुरू ठेवली आहे. बाल भैरवनाथ आणि दिलेला कौल तंतोतंत खरा ठरला आहे.नवीन वर्षाच्या मुहूर्तावर गुढीपाडव्याच्या दिवशी ग्रामस्थ व पुरोहित यांच्या उपस्थितीत पर्जन्यमान नक्षत्र तपासणीचा कार्यक्रम केला जातो. गुढीपाडव्याच्या एक दिवस आधी रात्री भैरवनाथ मंदिराच्या पाठीमागे असलेल्या आवारात गेल्या अनेक वर्षापासून पुरोहित व ग्रामस्थ यांच्या मदतीने अठरा नक्षत्र रुपी गाडगाच्या आकाराचे खड्डे घेतले जातात. या एकसारख्या खड्ड्यामध्ये वडाचे पाणे ठेवून या पानांमध्ये सप्तधान्य व पाणी साठविले जाते. रात्रभर ही नक्षत्र रुपी खड्डे झाकून ठेवली जातात. दुसर्‍या दिवशी म्हणजेच गुढीपाडव्याच्या दिवशी सकाळी बाल भैरवनाथ व माता जोगेश्‍वरी ची पुरोहित व पंचक्रोशीतील यजमानांच्या हस्ते विधिवत पूजा केली जाते. त्यानंतर चालू वर्षात पर्जन्यमान कसे होईल हे सांगण्यात येते. नक्षत्र रुपी खड्ड्यामध्ये वडाच्या पानांमध्ये जर जास्त पाणी शिल्लक राहिले तर त्या नक्षत्रात चांगला पाऊस, ज्या नक्षत्ररुपी खड्ड्यात मध्यम पाणी शिल्लक राहील त्या नक्षत्रात मध्यम पाऊस तर ज्या नक्षत्र रुपी खड्ड्यात पाणीच शिल्लक राहणार नाही ते नक्षत्र कोरडे जाणार असल्याचे कोईक सांगितले जाते. पुरोहित विनोद जोशी गुरु यांच्या हस्ते नक्षत्र रुपी खड्ड्यांची पूजा झाल्यानंतर 18 नक्षत्रा मधील पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला. अश्‍विनी नक्षत्रात चांगला पाऊस,भरणी नक्षत्रात चांगला पाऊस,कल्याणी कृतिका व रोहिणी नक्षत्रात मध्यम स्वरूपाचा पाऊस. मृग नक्षत्रात खूप चांगला पाऊस, आद्रता पुनर्वसू नक्षत्रात जेमतेम पाऊस, पुष्य नक्षत्रात चांगला पाऊस,अल्केशा नक्षत्रात जेमतेम, मघा पूर्वा नक्षत्रात जेमतेम, उत्तरा हस्त व चित्रा नक्षत्रात चांगल्या प्रकारे पाऊस, स्वाती विशाखा अनुराधा व ज्येष्ठा नक्षत्रात मध्यम स्वरूपाचा पाऊस अशाप्रकारे बाल भैरवनाथ व माता जोगेश्‍वरीने पावसाचा कौल दिला आहे. पर्जन्यमान वर्तवल्यानंतर पुरोहित विनोद जोशी यांनी चालू वर्ष कसे जाणार असल्याचे पंचांग वाचन करून सांगितले. ग्रामस्थांच्या उपस्थितीत चांदेकसाऱे यात्रेचे नियोजन करण्यात आले. तेलवण मंगळवार दिनांक 16 एप्रिल रोजी पडणार आहे. देवाला हळद 16 एप्रिल ला लावण्यात येईल. 17 एप्रिल ते 21 एप्रिल या कालावधीत तेलवण अर्थात उपवास करण्यात येणार आहे. 17 एप्रिल रोजी रामनवमी उत्सव. तर बाल भैरवनाथ व जोगेश्‍वरीचा रथ उत्सव 21 एप्रिल रोजी असणार आहे. जत्रा व कुस्त्यांचा हंगामा 22 एप्रिल रोजी होईल. हनुमान जयंती 23 एप्रिलला असून भैरवनाथ यात्रा उत्सव जवळपास पंधरा दिवस चालणार आहे. यावर्षीची यात्रा ही चांदे म्हणजेच चांदकर यांच्याकडे आहे. तर होन मंडळी चांदे यात्रा कमिटीला मदत करणार आहे. महाराष्ट्रातून येणार्‍या भाविकांना बाल भैरवनाथ महाराजांचे दर्शन होण्यासाठी श्री राम रतन पंचायतन आश्रम ट्रस्ट विशेष सुविधा उपलब्ध करून देणार आहे. बाल भैरवनाथ यात्रा उत्सव व दर्शनाचा पंचक्रोशीतील भाविकांनी लाभ घ्यावा असे आवाहन भैरवनाथ ट्रस्ट चांदेकसारे, यात्रा उत्सव कमिटी व चांदेकसारे ग्रामस्थांनी केले आहे

COMMENTS