Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

विदर्भासह मराठवाड्यात जोरदार पाऊस

मुंबई प्रतिनिधी - सध्या राज्यासह देशात पावसाची हजेरी पाहायला मिळत आहे. हवामान विभागाचा अंदाज खरा ठरला असून पुढील दोन ते तीन दिवस पावसाची शक्य

तुळसण येथे बिबट्या दुचाकीच्या आडवा : चालक जखमी
अवकाळी पावसामुळे शेतकरी हवालदिल
शिराळा शहरालगत चार महाकाय गव्यांचे दर्शन

मुंबई प्रतिनिधी – सध्या राज्यासह देशात पावसाची हजेरी पाहायला मिळत आहे. हवामान विभागाचा अंदाज खरा ठरला असून पुढील दोन ते तीन दिवस पावसाची शक्यता कायम आहे. विदर्भ, मराठवाड्यात अनेक ठिकाणी पावसाने हजेरी लावली आहे. देशासह महाराष्ट्रातील अनेक भागात सोमवारी पावसाने धुमाकूळ घातला आहे. अनेक भागात विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यांसह पाऊस झाला आहे. जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्याला रात्री आठ वाजताचे सुमारास अचानक अवकाळी पावसासह जोरदार गारपीट झाल्याने त्याचा फटका रब्बी हंगाममधील गहू, हरभरा, मकासह फळपिकांना बसला असून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. विजेच्या कडकडाटासह चाळीसगाव शहरासह तालुक्यातील अनेक भागात हा गारपीटसह मुसळधार पाऊस झाल्याची माहिती समोर आली आहे. सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, चाळीसगाव तालुक्यातील पाटणा, गणेशपूर, बेलदारवाडी, बाणगाव, शिंदी आणि ओढरे गावात गारपीट झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली असून या अवकाळी पावसामुळे रब्बी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. यात सर्वाधिक गहू आणि हरभरा पिकाला फटका बसला आहे.

शेतातील पिकांचं नुकसान होण्याची शक्यता  – हवामान विभागाने वर्तविलेल्या अंदाजानुसार, आज हिंगोली जिल्ह्यांमध्ये चार वाजताच्या सुमारास पावसाने हजेरी लावली आहे. जिल्ह्यातील कान्हेरगावनाका, कान्हारखेडा, कलबुर्गा, फाळेगाव, या भागात जोरदार पाऊस झाला आहे. या जोरदार पावसामुळे हवेत कमालीचा गारवा पसरला आहे. तर, या पावसाचा शेतातील पिकांना मोठा फटाका बसणार आहे. कापणीला आलेला गहू, कापूस, हरभरा यासह भाजीपाला वर्णीय पिकांना या पावसाचा मोठा फटाका बसला आहे, त्यामुळे शेतकरी संकटात सापडला आहे

COMMENTS