गोदावरी कालव्याच्या पाण्यासाठी 10 नोव्हेंबरपर्यंत अर्ज करा : कोल्हे

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

गोदावरी कालव्याच्या पाण्यासाठी 10 नोव्हेंबरपर्यंत अर्ज करा : कोल्हे

कोपरगाव/ता.प्रतिनिधी : चालु पावसाळी हंगामात उशीरा का होईना पर्जन्यमान झाल्याने दारणा, गंगापुर धरण समुहाबरोबरच अन्य धरणांतही पाण्यांचा साठा चांगल्या प

ढोरज्यात आधारकार्ड दुरुस्ती, अपडेट शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद
काँग्रेस खेळ मोडणार की माघार घेणार…? ; नगरच्या महापौरपदाची उत्सुकता शिगेला, आज होणार चित्र स्पष्ट
मोटारसायकलवरील मधल्याने महिलेचे गंठण धूमस्टाईलने पळविले

कोपरगाव/ता.प्रतिनिधी : चालु पावसाळी हंगामात उशीरा का होईना पर्जन्यमान झाल्याने दारणा, गंगापुर धरण समुहाबरोबरच अन्य धरणांतही पाण्यांचा साठा चांगल्या प्रमाणांत झालेला आहे, नाशिक पाटबंधारे विभागाचे कार्यक्षेत्रातील गोदावरी डाव्या आणि उजव्या कालव्यावरील रब्बी हंगामी भूसार, बारमाही, फळबाग पिकासाठी शेतकर्‍यांनी आपले पाणी अर्ज 10 नोव्हेंबरपर्यंत भरून द्यावे असे आवाहन भाजपाच्या प्रदेश सचिव स्नेहलता कोल्हे यांनी केले आहे.
स्नेहलता कोल्हे पुढे म्हणाल्या की, नाशिक पाटबंधारे विभागाने याबाबतचे जाहिर प्रकटन नुकतेच प्रसिध्द केलेले आहे. खरीप हंगामात अतिवृष्टीचा शेतक-यांना फटका बसला तेंव्हा रब्बी हंगामाचे नियोजन काटेकोरपणे केले जावे. बारमाही गोदावरी कालवे लाभधारक शेतक-यांना रब्बी हंगाम पिकांसाठी पाण्याची गरज आहे त्या शेतक-यांनी नमुना नं 7 वरील पाणी अर्ज तातडीने नजिकच्या सिंचन शाखा कार्यालयात 10 नोव्हेंबर पुर्वी सादर करावे म्हणून सुचित केलेले आहे.उर्ध्व गोदावरी खो-यातील सर्व धरणे शंभर टक्के भरलेली आहेत. जायकवाडी धरण समुहासाठी चालु पावसाळी हंगामात शंभर टक्के पाण्याचा साठा झाल्याने यंदाचे हंगामात समन्यायी पाणी वाटपाची चिंता मिटली आहे. गोदावरी उजव्या आणि डाव्या कालव्यावरील रब्बी पिकांना पाणी देण्यांबाबत नाशिक पाटबंधारे विभागाने हालचाली सुरू केल्या आहेत. कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत रब्बी व उन्हाळ हंगामाचे पाणी नियोजन ठरते मात्र मागील हंगामात ठरल्याप्रमाणे नाशिक पाटबंधारे विभागाने पाण्यांची आर्वतने दिली नाही त्यामुळे पिकांना गरजेच्यावेळी पाणी पुरवठा झाला नाही त्याचा फटका शेतक-यांना बसला, तेंव्हा चालु कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत रब्बी व उन्हाळ हंगामाचे पाटपाण्यांचे आवर्तन नियोजन वेळेत करावे, कालवा लाभक्षेत्रापासुन अडीच किलोमिटर हददीपर्यंतच पाणी पुरवठयाचे नियोजन होवु नये, गोदावरी कालवे बारमाही ब्लॉकधारक शेतक-यांना पाणीहक्क डावलु नये, सहकारी पाणीवापर संस्थांना मंजुर कोठयाप्रमाणेच पाणी द्यावे, रब्बी आर्वतनापुर्वी वितरीका उपवितरीका व मुख्य कालव्यातील काटेरी झुडपे, गबाळ याची स्वच्छता करावी, टेल टू हेड असेच पाटपाण्यांचे नियोजन व्हावे, शेतक-यांच्या भावनांचा विचार करावा केवळ बैठकांचा फार्स होवु नये असे सांगुन त्यांनी रब्बी हंगामात गोदावरी कालवे लाभधारक शेतक-यांनी जास्तीत जास्त पाणी मागणी अर्जाद्वारे नोंदवावी असे आवाहन सौ स्नेहलता कोल्हे यांनी केले.

COMMENTS