Homeताज्या बातम्या

मंडल आयोगामुळे ओबीसी व भटके-विमुक्त समाजाला सामाजिक न्यायाचा मार्ग खुला झाला-अ‍ॅड. सुभाष राऊतमंडल दिनानिमित्त दोदडगाव येथील मंडल स्तंभ स्मारकास मान्यवरांचे अभिवादन

मंडल आयोगाच्या अंमलबजावणीसाठी आदरणीय ना. छगनरावजी भुजबळ साहेब, स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे, माजी खासदार समीरभाऊ भुजबळ आणि माजी आमदार डॉ. नारायणराव

ओबीसी आरक्षणावर गदा? राज्य निवडणूक आयोगाचे नवे आदेश; ५० टक्क्यांच्या मर्यादेमुळे जागा कमी होणार
मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर मनोज जरांगे आक्रमक; राज्य सरकारला ३० मेपासून आमरण उपोषणाचा इशारा
ओबीसी जनगणनेसाठी आंदोलनाचा इशारा : वडेट्टीवार



मंडल आयोगाच्या अंमलबजावणीसाठी आदरणीय ना. छगनरावजी भुजबळ साहेब, स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे, माजी खासदार समीरभाऊ भुजबळ आणि माजी आमदार डॉ. नारायणराव मुंडे यांच्या योगदानाचा विशेष उल्लेख करत, मंडल आयोगाच्या अंमलबजावणीमुळे ओबीसी व भटके-विमुक्त समाजाला न्याय मिळाल्याचे अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे प्रदेश सरचिटणीस ड. सुभाष राऊत यांनी सांगून मंडल आयोगाच्या अंमलबजावणीसाठी विविध नेत्यांनी केलेल्या संघर्षाचा गौरव केला. सामाजिक न्यायाच्या लढ्यासाठी मंडल स्तंभ प्रेरणादायी केंद्र राहील, असेही त्यांनी यावेळी नमूद केले.
मंडल आयोग लागू दिनानिमित्त धुळे – सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील मौजे दोदडगाव (ता. अंबड, जि. जालना) येथे ओबीसी, भटके – विमुक्त समाजाचे प्रेरणास्थान असलेल्या मंडल स्तंभ स्मारकास अभिवादन करण्यात आले. मंडल स्तंभ स्मारक समितीच्या वतीने आयोजित या कार्यक्रमास विविध सामाजिक, शैक्षणिक व समता चळवळीतील मान्यवरांची उपस्थिती लाभली. कार्यक्रमास मंडल स्तंभ निर्माते, ओबीसी चळवळीचे ज्येष्ठ नेते व माजी आमदार डॉ. नारायणरावजी मुंडे, मंडल स्तंभ स्मारक समितीचे अध्यक्ष प्रा. सत्संग मुंडे, अखिल भारतीय समता परिषदेचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस ड. सुभाष राऊत, प्रदेश संघटक प्रा. रवींद्र खरात, समितीचे सदस्य सुघोष मुंडे, दोदडगावचे सरपंच बंडू मुंडे, रणजीत बांगर, भानुदास केकान, रामकिसन घुगे, महारुद्र केकान, सुभाष चाटे, बटुळे मामा, अनुज चेपटे, बाळासाहेब पांढरे यांच्यासह पंचक्रोशीतील असंख्य समाजबांधव उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात मंडल स्तंभ स्मारकास अभिवादन करून करण्यात आली. प्रास्ताविकात मंडल स्तंभ स्मारक समितीचे अध्यक्ष प्रा. सत्संग मुंडे यांनी मंडल स्तंभ उभारणीमागील भूमिका स्पष्ट केली. ओबीसी, भटके – विमुक्त समाजाला सामाजिक, राजकीय आणि प्रशासकीय क्षेत्रात न्याय्य प्रतिनिधित्व मिळावे, संविधानाने दिलेले अधिकार प्रभावीपणे प्राप्त व्हावेत आणि सामाजिक न्यायासाठी संघर्षाची प्रेरणा मिळावी, या उद्देशाने मंडल स्तंभाची निर्मिती करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. भविष्यातही हा स्तंभ सामाजिक न्यायाच्या चळवळीस प्रेरणा देत राहील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. अखिल भारतीय समता परिषदेचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस ड. सुभाष राऊत यांनी आपल्या मनोगतात मंडल आयोगाच्या अंमलबजावणीसाठी विविध नेत्यांनी केलेल्या संघर्षाचा गौरव केला. त्यांनी आदरणीय मा.ना.छगनरावजी भुजबळ साहेब, स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे, माजी खासदार समीरभाऊ भुजबळ आणि माजी आमदार डॉ. नारायणराव मुंडे यांच्या योगदानाचा विशेष उल्लेख करत, मंडल आयोगाच्या अंमलबजावणीमुळे ओबीसी व भटके-विमुक्त समाजाला न्याय मिळाल्याचे सांगितले. सामाजिक न्यायाच्या लढ्यासाठी मंडल स्तंभ प्रेरणादायी केंद्र राहील, असेही त्यांनी नमूद केले. प्रदेश संघटक प्रा. रवींद्र खरात यांनी देशातील पहिला मंडल स्तंभ हा ओबीसी व भटके-विमुक्त समाजाच्या संघर्षाचे प्रतीक असल्याचे सांगितले. दरवर्षी 7 ऑगस्ट हा दिवस मंडल दिन म्हणून मोठ्या उत्साहात साजरा करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला. अध्यक्षीय मनोगतात माजी आमदार डॉ. नारायणराव मुंडे यांनी मंडल आयोगाच्या अंमलबजावणीमुळे ओबीसी व भटके – विमुक्त समाजाला सामाजिक न्याय आणि सन्मानाचे हक्क मिळाल्याचे सांगितले. समाजातील वंचित घटकांच्या घटनात्मक अधिकारांच्या संरक्षणासाठी एकजुटीने कार्य करण्याचे आवाहन त्यांनी केले. तसेच केंद्र सरकारच्या समान नागरी कायद्याबाबत त्यांनी आपली भूमिका मांडत, या विषयावर व्यापक जनजागृती व लोकशाही मार्गाने आंदोलन उभारण्याचा निर्धार व्यक्त केला. कार्यक्रमास मंडल स्तंभ स्मारक समितीचे सर्व पदाधिकारी, सदस्य तसेच दोदडगाव व पंचक्रोशीतील मोठ्या संख्येने समाजबांधव उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. दरगुडे यांनी केले, तर उपस्थितांचे आभार प्राचार्य डॉ. सुनंदा तिडके यांनी मानले.

COMMENTS