माजलगाव ते तेलगाव रस्ता मृत्यूचा सापळा बनला आहे. या 20 किलोमीटरच्या महामार्गावर पडलेल्या भेगांमुळे आतापर्यंत खूप जणांचा बळी गेला आहे.माजलगाव ते त

माजलगाव ते तेलगाव रस्ता मृत्यूचा सापळा बनला आहे. या 20 किलोमीटरच्या महामार्गावर पडलेल्या भेगांमुळे आतापर्यंत खूप जणांचा बळी गेला आहे.
माजलगाव ते तेलगाव या अवघ्या 20 किलोमीटरच्या प्रवासात आज मृत्यू पावलापावलावर दबा धरून बसला आहे.खामगाव-पंढरपूर पालखी मार्गाचा भाग असलेल्या या महामार्गावर गेल्या काही वर्षांत भीषण अपघातांची मालिका सुरू होती. रस्त्याला पडलेल्या खोल भेगा आणि धोकादायक स्थितीमुळे दुचाकीस्वार यांसह अनेक वाहनधारकांना जीव गमवावा लागला. गेल्या चार वर्षांत तब्बल बर्याच जणांचा अपघातात मृत्यू झाल्याची नोंद असून शेकडो जण गंभीर जखमी झाले आहेत. अनेक कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला होता.विशेष म्हणजे सार्वजनिक बांधकाम विभाग आणि महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ यांच्यातील तांत्रिक हस्तांतरणाच्या प्रक्रियेमुळे या रस्त्याच्या दुरुस्तीचे काम दीर्घकाळ रखडले होते. त्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप निर्माण झाला होता. विविध सामाजिक संघटना, ग्रामस्थ आणि वाहनधारकांनी लवकरच रस्त्याचे काम सुरू करण्यात यावे याची मागणी जोर धरत आहे

COMMENTS