Homeताज्या बातम्या

सागवान तस्करांनी वनविभागाच्या गाडीला दिली धडक; थरारक पाठलाग करून तिघांना बेड्या

वनविभागाच्या पथकाला चकवा देऊन व त्यांच्या वाहनाला धडक देऊन पळून जाणार्‍या सागवान तस्करांच्या वन कर्मचार्‍यांनी अत्यंत हुशारीने मुसक्या आवळल्या आह

मुसळधार पावसात वनविभागाची गस्त; चिखली परिसरात 8 तस्कर लाकूड टाकून पसार
अवैध प्रकारांची तक्रार केल्याचा राग?; वनपरिक्षेत्राधिकार्‍यांनी धमकी दिल्याचा भाजप पदाधिकार्‍यांचा आरोप
वनपरिक्षेत्राधिकार्‍यांकडून भाजप पदाधिकार्‍याला धमकीचा आरोप



वनविभागाच्या पथकाला चकवा देऊन व त्यांच्या वाहनाला धडक देऊन पळून जाणार्‍या सागवान तस्करांच्या वन कर्मचार्‍यांनी अत्यंत हुशारीने मुसक्या आवळल्या आहेत. 6 ऑगस्ट रोजी पहाटे 3:30 वाजेच्या सुमारास बेंदी तांडा फाट्याजवळ ही धाडसी कारवाई करण्यात आली.
चिखली वनोपज तपासणी नाक्यावरून अवैध सागवान लाकडाची वाहतूक होणार असल्याची गुप्त माहिती गस्ती पथकाला मिळाली होती. त्यानुसार कर्मचार्‍यांनी नाक्यावर नाकेबंदी केली. एका संशयित मोटरसायकलच्या मागे येणार्‍या कारला थांबवण्याचा इशारा केला असता, तस्करांनी कार थेट वनविभागाच्या गाडीवर धडकवली आणि किनवटच्या दिशेने पळ काढला. वन कर्मचारी निघून गेल्याचा गैरसमज करून तस्करांनी अंधाराचा फायदा घेत पुन्हा चिखलीकडे जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, आधीच सतर्क असलेल्या वन कर्मचार्‍यांनी बेंदी तांडा फाट्याजवळ रचलेल्या सापळ्यात तिघांना रंगेहात पकडले. या प्रकरणी चिखली बु. (ता. किनवट, जि. नांदेड) येथील शेख कासिम शेख उस्मान, शेख जावेद शेख रफीक आणि शेख सोहेल शेख शौकत या तिघांना अटक करण्यात आली आहे. यांच्या कडून 50 हजार रुपयांची टाटा इंडिका कार (एम एच-26-ए.सी- 7203), 70 हजार रुपयांची मोटरसायकल (एम एच-26- डि.सी-2423) आणि 3 हजार 629 रुपये किमतीचे 0.172 घ.मी. सागवान लाकूड.जप्त करुन आरोपींविरुद्ध भारतीय वन अधिनियम 1927 अन्वये वन गुन्हा क्र. 02/2026 नोंदवण्यात आला आहे. ही धडक कारवाई नांदेडच्या उपवनसंरक्षक मनीषा पाटील, सहाय्यक वनसंरक्षक किरण चव्हाण, वनपरिक्षेत्र अधिकारी धीरज मदने, सी. जी. पोतूलवार, एन. एन. केंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल बी. टी. जाधव, मनोज गुरसाळी, वनरक्षक रवी दांडेगावकर, अरुण चुकलवार, मारोती केंद्रे व चालक बाळकृष्ण आवले यांच्या पथकाने केली.

COMMENTS