Homeताज्या बातम्या

गेवराईत ’सुब्रतो मुखर्जी चषक’ फुटबॉल स्पर्धेचा उत्साहपूर्ण शुभारंभ;  18 शालेय संघांचा सहभाग

 क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय तथा जिल्हा क्रीडा परिषद, बीड यांच्या संयुक्त विद्यमा

योगेश फुलशंकर यांचे प्रदीर्घ आजाराने निधनअर्जुन फुलशंकर यांना पुत्रशोक
बीडच्या शिक्षणाधिकार्याकडून उच्च न्यायालयाचा अवमानशिक्षणाधिकारी व संबंधित लिपिकास उच्च न्यायालयाची नोटीस
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली गेवराईत युवासेनेचा विस्तारमादळमोही सर्कलसह पाच गावांत युवासेनेच्या शाखांचे उद्घाटन; नव्या पदाधिकार्‍यांची नियुक्ती



 क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय तथा जिल्हा क्रीडा परिषद, बीड यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ’सुब्रतो मुखर्जी चषक फुटबॉल स्पर्धे’ला 23 जुलै रोजी गेवराई येथील र.भ. अट्टल महाविद्यालय मैदानावर मोठ्या उत्साहात सुरुवात झाली. या स्पर्धेचे उद्घाटन आमदार विजयसिंह पंडित यांच्या हस्ते, तसेच उपजिल्हाधिकारी शुभम पवार, तहसीलदार संजय सोनवणे आणि जिल्हा क्रीडा अधिकारी अरविंद विद्यागर यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले.
उद्घाटन प्रसंगी मार्गदर्शन करताना आमदार विजयसिंह पंडित म्हणाले की, विद्यार्थ्यांनी जीवनात खेळाचे महत्त्व समजून घ्यावे. खेळामुळे आरोग्यास अनेक फायदे होतात. त्यामुळे खेळाडूंनी स्पर्धेत खेळताना केवळ हार-जीत याकडे लक्ष न देता, आपला खेळ अधिक दर्जेदार कसा होईल, यावर लक्ष केंद्रित करावे. सदर स्पर्धेत जिल्ह्यातील एकूण 18 संघांनी सहभाग नोंदविला. यातील 17 वर्षांखालील मुलांच्या गटात पोदार इंटरनॅशनल स्कूलने प्रथम, तर ज्ञानेश्वर पब्लिक स्कूलने द्वितीय क्रमांक पटकावला. 17 वर्षांखालील मुलींच्या गटात सेंट न्स स्कूलने प्रथम, तर पोदार इंटरनॅशनल स्कूल संघाने द्वितीय क्रमांक मिळविला. तसेच 15 वर्षांखालील मुलांच्या गटामध्ये सेंट न्स स्कूल संघाने प्रथम, तर शिवशारदा पब्लिक स्कूल, गढी या संघाने द्वितीय क्रमांक पटकावला. ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी जिल्हा क्रीडा अधिकारी अरविंद विद्यागर यांच्या मार्गदर्शनाखाली क्रीडा अधिकारी कालिदास होसुरकर, तालुका क्रीडा अधिकारी सुरेंद्र कराड आणि संदीप ढाकणे यांनी विशेष परिश्रम घेतले.

COMMENTS