Homeताज्या बातम्या

उत्तर महाराष्ट्र विभागीय अध्यक्षपदी गाडगे

श्रीगोंदा : संघटनेचे प्रदेश अध्यक्ष निलेश सोमाणी, राज्य संघटक संजय भोकरे यांच्या सूचनेनुसार संघटनेचे प्रदेश सरचिटणीस डॉ. विश्वासराव आरोटे यांच्या

दडपशाही नको, संवाद हवा !
ढगाळ वातावरणामुळे पिकात गवत; तणनाशक फवारणी शेतकऱ्यांसाठी ठरतेय डोकेदुखी
गरीबांवर कारवाई, धनदांडग्यांना अभय? शेवगाव नगरपरिषदेच्या अतिक्रमण मोहिमेवर ‘वंचित’चा सवाल

श्रीगोंदा : संघटनेचे प्रदेश अध्यक्ष निलेश सोमाणी, राज्य संघटक संजय भोकरे यांच्या सूचनेनुसार संघटनेचे प्रदेश सरचिटणीस डॉ. विश्वासराव आरोटे यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या उत्तर महाराष्ट्र विभागीय अध्यक्षपदी अहिल्यानगर जिल्हाध्यक्ष दत्ता गाडगे यांची निवड करण्यात आली आहे.

दत्ता गाडगे यांनी पत्रकार संघाच्या माध्यमातून पत्रकारांच्या विविध प्रश्नांसाठी सातत्याने पाठपुरावा केला आहे. पत्रकारांचे हक्क, त्यांचे संरक्षण, संघटन बळकट करणे तसेच ग्रामीण पत्रकारितेला सक्षम व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी त्यांनी उल्लेखनीय कार्य केले आहे. त्यांच्या कार्याची दखल घेत महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या प्रदेश कार्यकारिणीने त्यांच्यावर उत्तर महाराष्ट्र विभागीय अध्यक्षपदाची जबाबदारी सोपविली आहे.

उत्तर महाराष्ट्र विभागातील पत्रकार संघटन अधिक मजबूत करणे, पत्रकारांचे प्रश्न शासन स्तरावर प्रभावीपणे मांडणे, नवोदित पत्रकारांना मार्गदर्शन करणे आणि पत्रकारांच्या कल्याणासाठी विविध उपक्रम राबविणे, या दृष्टीने ते कार्य करतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. दत्ता गाडगे यांच्या निवडीबद्दल पत्रकार, सामाजिक, राजकीय व विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

COMMENTS